संजय गांधी निराधार अनुदान योजना l Sanjay Gandhi Yojana in Marathi

संजय गांधी निराधार अनुदान योजना (Sanjay Gandhi Yojana) ही योजना 65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला यांच्यासाठी राबवण्यात आली आहे. ही योजना विशेष सहाय्य योजना यामध्ये मोडते. शासनाने 2010 मध्ये विशेष सहाय्यक कार्यक्रमाद्वारे काही राज्य पुरस्कृत योजना राबविण्यात आल्या त्याच्यापैकी ही एक योजना आहे.

Sanjay Gandhi Yojana
Sanjay Gandhi Yojana

याच्यामध्येअपंगातील सर्व प्रवर्ग अनाथ मुले, निराधार पुरुष व महिला, क्षयरोग, कर्करोगग्रस्त, कुष्ठरोग यांसारख्या आजारांमुळे अर्थार्जन चालवू न शकणारे महिला व पुरुष, निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रियेतील झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या अत्याचारित व वेश्या, व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, तृतीयपंथी, देवदासी, 35 वर्षांवरील स्त्री, तुरुंगात शिक्षा घेत असलेल्या, कायद्याच्या सिकलसेल ग्रस्त या सर्व जणांना या योजनेचा लाभ मिळतो.

संजय गांधी निराधार अनुदान योजना (Sanjay Gandhi Yojana) या योजनेमध्ये दारिद्र्यरेषेखातील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा 21 हजार रुपये पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. या योजनेखाली पात्र होणाऱ्या कुटुंबास एक लाभार्थी असल्यास दरमहा रुपये 600 तर एका कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्यास दरमहा 900 रुपये इतके आर्थिक सहाय्य करण्यात येते.

ज्या विधवांना कोणाचाच आधार नाही. ज्या विधवा आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी असमर्थ आहेत. अशा महिलांना देखील या योजनेअंतर्गत ठराविक रक्कम देण्यात येते.

ज्या महिलां त्रितीयपंती आहेत त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येतो. ज्या विधवा शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यामुळे विधवा झालेल्या आहेत, त्या देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

ज्या व्यक्ती अपंग आहेत किंवा ज्या व्यक्ती अपंग या प्रवर्गामध्ये मोडतात त्या सर्वांना देखील 65 वर्षानंतर या आर्थिक निधीचा लाभ घेता येऊ शकतो. बरेच महिलां व पुरुष यांना काही कारणामुळे कर्करोग, एड्स, कुष्ठरोग, क्षयरोग अशा रोगांना बळी पडला जातो अशा व्यक्तींना देखील Sanjay Gandhi Yojana या योजनेचा लाभ घेता येतो.

या सर्व व्यक्तींसाठी प्रतिमहा 600 रुपये ते 900 रुपये इतकी रक्कम देण्यात येते. ज्या महिलांना घटस्फोट तर मिळाला आहे पण घटस्फोट घेतल्यानंतर त्यांना पोटगी देण्यात आली नाही, अशा महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता येतो. 35 वर्षांवरील अविवाहीत यांना देखील या योजनेमध्ये सामील करण्यात आले आहे.

Sanjay Gandhi Yojana या अनुदान योजनेसाठी लागणारी पात्रता –

वय हे 65 वर्षापेक्षा कमी असावे.

त्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रुपये 21000 पर्यंत असणे आवश्यक.

Sanjay Gandhi Yojana या अनुदान योजनेसाठी लागणारी कागदपत्रे –

  • संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी केलेला अर्ज.
  • रहिवासी दाखला तो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक.
  • वयाचा दाखला यासाठी त्याचे वय 65 वर्षापेक्षा कमी असावे.
  • कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला ज्याच्यामध्ये त्याचे कौटुंबिक उत्पन्न 21000 पर्यंत आहे याचा पुरावा मिळेल.
  • जर ती व्यक्ती रोगी असेल तर सिविल सर्जन आणि शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकाद्वारे आजाराचे प्रमाणपत्र असणे आवश्यक.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही संजय गांधी योजना संबंधित तालुका तहसीलदार यांच्याशी संपर्क करू शकता.
संजय गांधी निराधार अनुदान योजना अर्ज करण्यासाठी लिंकवर क्लिक करा आणि अर्ज भरा.

आणखी काही योजना –

अकरावी ते बारावी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना

पहिली ते दहावीच्या वर्गात साठी आर्थिक सहाय्य योजना

अटल पेन्शन योजना

इंदिरा आवास योजना

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Sunshine Coast-Au12 Dessert Recipes for the Mediterranean No-Sugar DietThe 11 Most Popular Tomatoes you Should TryThe 11 Most amazing places on EarthWhy Smoothies Melt the Fat?
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Sunshine Coast-Au12 Dessert Recipes for the Mediterranean No-Sugar DietThe 11 Most Popular Tomatoes you Should TryThe 11 Most amazing places on EarthWhy Smoothies Melt the Fat?