आदिवासी उमेदवारांसाठी सेवा योजना प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्र l Seva Yojana Training and Guidance Center

आदिवासी उमेदवारांसाठी सेवा योजना प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्र l Seva Yojana Training and Guidance Center

आदिवासी उमेदवारांना स्पर्धा परीक्षेची माहिती देणे व सदर परीक्षेसाठी त्यांना तयार करून घेणे हा Seva Yojana Training and Guidance Center या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. शासकीय व निमशासकीय संस्थांमध्ये आदिवासी उमेदवारासाठी राखीव पदे असतात.

ज्या पदांसाठी आदिवासी उमेदवारांची आवश्यकता असते. आदिवासी उमेदवार या पदांसाठी अपात्र ठरत असल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी व आदिवासी उमेदवारांचा विकास व मदत करण्यासाठी ही योजना अमलात आणण्याचा निर्णय शासनाने घेतला.

आदिवासी लोकांमध्ये शिक्षणाचा अभाव असल्यामुळे त्यांची प्रगती खुंटत जाते. त्याच्यामुळे रोजगाराचे प्रॉब्लेम वाढत जातात, अशा आदिवासी लोकांसाठी त्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी व त्यांना योग्य ते प्रशिक्षण मोफत देऊन त्यांची उन्नती घडवून आणण्यासाठी आदिवासी उमेदवार सेवा योजना प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्र (Seva Yojana Training and Guidance Center) ही कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यांच्याद्वारे सुरू करण्यात आली.

आदिवासी उमेदवारांसाठी सेवा योजनेचा उद्देश

  • आदिवासी उमेदवारास स्पर्धा परीक्षेविषयी माहिती व परीक्षेस बसण्यासाठी त्याला प्रवृत्त करणे.
  • स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन ज्या शासकीय व निमशासकीय संस्थांमध्ये रिक्त पदे आहेत त्या जागी त्यांची नियुक्ती.
  • आदिवासी लोकांची परिस्थिती सुधारून विकास व उन्नती घडवून आणण्याचा प्रयत्न.
  • आदिवासी प्रशिक्षणार्थींना विद्यावेतन.
  • प्रशिक्षणात त्यांना स्पर्धा परीक्षा तयारीसाठी आवश्यक असलेल्या चार पुस्तकांचा संच मोफत देणे.

ज्याच्या अन्वये आदिवासी उमेदवारास स्पर्धा परीक्षेविषयी माहिती दिली जाते व त्या माहितीनुसार त्या परीक्षेस बसण्यासाठी त्याला प्रवृत्त केले जाते.

सदर परीक्षेसाठी त्यांना व्यवस्थित तयारी करून घेण्यासाठी ही Seva Yojana Training and Guidance Center उभारण्यात आली आहेत. ज्याच्या मदतीने ते स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन ज्या शासकीय व निमशासकीय संस्थांमध्ये रिक्त पदे आहेत त्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात यावी यासाठी ही केंद्र सुरू करण्यात आली आहेत.

Seva Yojana Training and Guidance Center चा मूळ उद्देश म्हणजे आदिवासी लोकांची परिस्थिती सुधारून विकास व उन्नती घडवून आणण्याचा शासनाचा एक चांगला उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

1984 पासून शासनाने जळगाव, अमरावती, नाशिक कळवण, अच,पूर अशा काही जिल्ह्यांमध्ये आदिवासी उमेदवारांसाठी अशी प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आली.

जिल्हा भंडारा, चंद्रपूर, पुणे, किनवट, नांदेड इत्यादी ठिकाणी देखील आदिवासी उमेदवारांसाठी 95-96 मध्ये प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आली.

गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील 1994 पासून आदिवासी लोकांसाठी स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले. स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी आदिवासी उमेदवारांकडून केंद्रमार्फत साडेतीन महिन्याचे दरवर्षी तीन प्रशिक्षण सत्रे चालवली जातात.

आदिवासी प्रशिक्षणार्थींना दरमहा 1000 प्रमाणे विद्यावेतन दिले जाते. व्याख्यात्यांना दर तासाला शंभर रुपये प्रमाणे मानधन दिले जाते. 2006 नुसार हे प्रशिक्षण चालू करण्यात आले तसेच प्रशिक्षणात त्यांना स्पर्धा परीक्षा तयारीसाठी आवश्यक असलेल्या चार पुस्तकांचा संच मोफत देण्यात येतो.

प्रशिक्षण देण्यासाठी जवळच्या महाविद्यालयातील तज्ञ प्राध्यापकांना तासिका पद्धतीवर नियुक्त करण्यात येते. गरजेनुसार बँक वित्तीय संस्था, मान्यवर सेवाभावी संस्था यांमधील अधिकारी व पदाधिकारी व शासनाचे तज्ञाधिकारी यांची मार्गदर्शनपर भाषणे देण्यासाठी देखील त्यांना प्राचारण करण्यात येते.

उमेदवारांना विविध रिक्त पदांची, स्पर्धा परीक्षांची माहिती वेळोवेळी पोस्टाने कळवली जाते. फॉर्म पाठवले जातात. प्रसंगानुसार खास प्रशिक्षण वर्ग देखील आयोजित करण्यात येतात.

अशा प्रकारे आदिवासी विभागांमध्ये चांगला रीतीने सुधारणा घडवून आणण्यासाठी शासनाने घेतलेला हा निर्णय अतिशय उल्लेखनीय आहे जेणेकरून आदिवासी उमेदवार आणि आदिवासी लोकांमध्ये शिक्षणाबद्दल जागृती निर्माण होऊन त्यांची उन्नती व आर्थिक स्थिती सुधारण्यास त्यांना नक्कीच मदत मिळेल.

आणखी काही योजना

अकरावी ते बारावी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना

पहिली ते दहावीच्या वर्गात साठी आर्थिक सहाय्य योजना

अटल पेन्शन योजना

इंदिरा आवास योजना

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Hobart-Au11 low-carb breakfast recipes that taste good11 Easy paleo recipesRefreshing and healthy green smoothie11 Fast food restaurant to eat in Nashville, Tennessee
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Hobart-Au11 low-carb breakfast recipes that taste good11 Easy paleo recipesRefreshing and healthy green smoothie11 Fast food restaurant to eat in Nashville, Tennessee