शिवणकाम उद्योग । Sewing business in Marathi

शिवणकाम उद्योग । Sewing business in Marathi

Sewing business म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे शिवून ते विकणे. वेगवेगळ्या फॅशनचे कपडे तयार करून ते विकणे आणि त्यापासून नफा कमावणे.

Sewing business
Sewing business

तुम्ही जर एक चांगल्या प्रकारचे कपडे आणि विविध प्रकारच्या attractive designs प्रमाणे शिवणकाम करता येत असेल किंवा तुम्हाला ते शिकायची आवड असेल तर तुम्ही Sewing business हा छोटासा उद्योग घरच्या घरी चालू करू शकता. त्यासाठी तुम्हाला शिवणकामाची मशीन फक्त विकत घ्यावी लागेल. त्याबरोबरच तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे धागे, सुई वगैरे साहित्य लागेल.

सुरुवातीला तुम्ही स्वतः शिवणकाम करून घरातील कपडे शिवू शकता. त्यानंतर तुम्ही तुमच्या ओळखीने आजूबाजूच्या लोकांचीदेखील कपडे शिवण्यासाठी घेऊ शकता. तुम्ही नवीन कपडे शिवून किंवा जुनी कपडे उसवलेली शिवून देऊन सुद्धा नफा मिळवू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस डिझाईन तयार करून तुम्ही ते विकून चांगला नफा कमवण्याची एक चांगली संधी आहे.

कुर्ती, ब्लॉउज, पेटीकोट, फॉल , फिको असे बरेच काही करू शकता. तुम्हाला जर एम्ब्रॉयडरी किंवा अजून काही वेगवेगळ्या प्रकारच्या designs किंवा पॅचवर्क करता असेल तर तुम्ही ते पण बनवून एक्सट्रा चार्जेस घेऊन अजून नफा कमावू शकाल. काही जणांना लहान मुलांची frocks आणि टॉप्स शिवायला चांगले जमतात तर ते सुद्धा तुम्ही विकून नफा कमवू शकता.

आजकाल रेडिमेड ब्लॉउज, रेडिमेड साडी सुद्धा तयार केली जाते. त्याबरोबर तुम्ही छोट्या छोट्या बाजारासाठी लागणाऱ्या पिशव्या, बटवे सुद्धा तयार करून नफा मिळवू शकता.

Sewing business करून नफा मिळवण्यासाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत. जसजसे तुमचे ग्राहक वाढत जातील तसतसे नंतर तुम्ही स्वतःचे एक बुटीक सुद्धा उभारू शकता. शाळेसाठी लागणारे गणवेश बनवून सुद्धा तुम्ही तुमचा नफा कमवू शकता.

Sewing Machine price । शिवण मशीनची किंमत

Sewing business साठी लागणाऱ्या मशीनची किंमत साधारण १०,००० ते १५,००० रुपये दरम्यान असते. तुम्ही जर ऑटोमॅटिक मशीन घेतली तर ती थोडी महाग पडते. पण usha, singer ह्यासारख्या चांगल्या मशीन तुम्ही १०,००० रुपयापर्यंत खरेदी करू शकता. मशीनसोबत तुम्हाला धागे,कात्री,सुया,measuring टेप, buttons, फ्री मध्ये मिळू शकते.

तुम्ही काय काय शिवू शकता । What you can Sew by using Sewing Machine

१. तुम्ही जर professionally कोर्स करून शिवणकाम शिकला असाल तर तुम्ही सर्व प्रकारचे कपडे शिवून तुमचा उद्योग सुरु करू शकता. जसे कि ब्लॉउज, छोट्या पिशव्या, पेटीकोट, कुर्ती इत्यादी.

२. तुम्हाला जर एकाच गोष्टींमध्ये वेगवेगळी variety करून त्यातच specialization करायचे असेल तर तुम्हाला सर्वात जास्त चांगले काय शिवण करता येते त्यामध्ये तुम्ही तुमच्या कलेप्रमाणे वेगवेगळ्या designs करून तुम्ही विकू शकाल.

३. तुम्ही season प्रमाणे लागणारी सुद्धा कपडे विकायला ठेवू शकता.

४. काही लोकांना functions किंवा फेस्टिवलच्या प्रोग्रॅम साठी भाडेतत्वावर कपडे लागतात तुम्ही तशी कपडे सुद्धा बनवून भाडेतत्वावर देऊ शकता.

५. शाळेचा गणवेश बनवण्यासाठी सध्या खूप मागणी आहे. तुम्ही शाळेमध्ये जाऊन तुम्ही गणवेशासाठी चांगली मोठी ऑर्डर घेऊ शकता.

६. फॉल आणि पिको ह्यासाठी सुद्धा खूप कस्टमर मिळतात. तुम्ही ह्यासाठीसुद्दा काम करू शकता.

७. छोट्या छोट्या लहान वेगवेगळ्या प्रकारच्या design मध्ये जर तुम्ही पर्स तयार करून विकल्या तर ह्यामध्ये पण तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो.

८. रेडिमेड साडी – रेडिमेड साडी जर तुम्ही तयार करत असाल तर ह्यामध्ये सुद्धा खूप फायदा आहे. सणासुदीच्या वेळी लहान मुलीना रेडिमेड साड्या traditional डे च्या दिवशी खूप लागतात. त्या जरी तुम्ही बनवून विकल्या तरी चांगला नफा तुम्हाला मिळू शकतो.

९. बेबी frocks – तुम्ही छोटे छोटे लहान मुलींसाठी फ्रॉक्स बनवून सुद्धा तुम्ही त्याची विक्री करू शकता.

१०. उशीची कव्हर, उशी, बेडशीट, सोफा कव्हर सारख्या वस्तू बनवून सुद्धा तुम्ही तुमचा उद्योग चालू करू शकता.

११.  कंपनीसाठी सुद्धा काही ठिकाणी युनिफॉर्म असतात. त्याच्या ऑर्डर घेऊन सुद्धा तुम्ही नफा कमवू शकता.

१२. तुम्हाला जर स्कार्फ, स्वेटर्स, मफलर ह्यासारख्या वस्तू बनवून त्या तुम्ही विकू शकता.

Money with your sewing skills । शिवणकाम आणि त्यापासून मिळणारे प्रॉफिट.

Sewing business करून तुम्ही भरपूर कमावू शकता. तुम्हाला फक्त एकच चांगली गोष्ट निवडून तुम्ही त्यामध्येच तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे कलाकौशल्ये वापरून attractive designs तयार करून तुम्ही तुमचा business चांगल्या रीतीने वाढवू शकता. 

सुरुवातीला तुम्ही फक्त स्वतः काम करू शकता नंतर तुमच्याकडे काम वाढत गेले कि तुम्ही काही लोक तुमच्या हाताखाली ठेवून तुमचा Sewing business चांगल्या रीतीने वाढवू शकता. तुमच्या वस्तूची जशी मागणी वाढत जाईल तसे तुम्ही आणखीन जागा घेऊन तिथे तुमचे बुटीक तयार करून वेगवेगळे कारागीर ठेवून तुमचा उद्योग चांगल्या प्रकारे वाढेल.   

Improve your Sewing Skills to grow your business । शिवणकामातील वेगवेगळी कौशल्ये वाढवून तुम्ही तुमचा उद्योग चांगल्या प्रकारे वाढवा.

तुम्हाला जर तुमचे प्रॉफिट वाढवायचे असेल तर तुम्हाला Sewing business मधले नवीन ज्या काही गोष्टी येतील त्या तुम्ही शिकणे तितकेच गरजेचे आहे. तुम्ही ज्या काही नवीन फॅशन्स येतील त्याप्रमाणे कपड्यांचे पॅटर्न तयार करून त्यामध्ये पारंगत होणे सुद्धा महत्वाचे असते.

१. काळजीपूर्वक वेगवेगळे पॅटर्न तयार करणे.

२. sewing मध्ये काही चुका होतील तर त्या सुधारणे.

३. मालासाठी चांगल्या दर्जेचे फॅब्रिक वापरणे.

४. वेगवेगळ्या प्रकारची auomatic उपकरणे उपलब्ध असतील तर त्याचा वापर करून कमीत कमी वेळेत चांगला माल तयार करणे.

४. लोकांना जसे हवे असतील तशाच प्रकारची कपडे आणि designs त्यांना उपलब्ध करून देणे.

४. माल वेळच्यावेळी तयार ठेवणे.

५. मालाची packaging व्यवस्थित करणे.

६. माल ग्राहकाकडे वेळच्यावेळी पोहोच करणे.

अशा प्रकारे छोट्याछोट्या गोष्टींमध्ये तुम्ही जर सुधारणा केल्या तर तुमच्या मालाचा दर्जा वाढेल आणि त्यामुळे बाजारात त्याची मागणी वाढेल. ग्राहकां त्यामुळे तुमच्याकडून माल घेतील.

बेसिक शिवणकाम आणि त्याची माहिती. । Basic sewing skills

  • तुम्ही शिवणकाम कुणाकडेही शिकू शकता.
  • सुरुवातीला घरातील जुन्या कपड्यांचा वापर करून तुम्ही कपडे शिवून त्यावर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता.
  • तुमचा चांगला शिवणकामामध्ये हात बसला कि तुम्ही नंतर बाहेरची कपडे शिवण्यासाठी घेऊ शकता.
  • ह्याबरोबर तुम्ही फाटलेली कपडे सुद्धा शिवून देऊ शकता.
  • सुरुवातीला सोप्या सोप्या वस्तू किंवा कपडे तयार करून त्या विकायला सुरुवात करा.
  • नंतर हळूहळू तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या कपडे शिवायला घ्या.
  • अशा प्रकारे तुम्ही नंतर मग functions किंवा ट्रॅडीशन प्रमाणे लागणारी कपडे सुद्धा तयार करू शकता.
  • नवीन कुठले पॅटर्न आले कि त्यावर लगेच काम करून ते शिकून घ्या.
  • काही चूक कुठे होत असेल तर त्यावर सारखे काम करून चांगली प्रॅक्टिस करून ती सुधारून घ्या. 

शिवणकाम शिकवा आणि कमवा । Share your sewing skill with others

तुम्ही Sewing business मध्ये जसजसे एक्स्पर्ट व्हाल तसतसे नंतर ते शिवणकाम तुम्ही दुसऱ्यांना सुद्धा शिकवू शकता. तुम्ही तुमच्या हाताखाली काम करण्यासाठी ह्यापैकी कोणीतरी पुढे मदतीला ठेवू शकता.

तुम्ही सुरुवातीला २ ते ३ लोकांना शिवणकाम शिकवायला चालू करू शकता. आणि त्यांना शिकण्यासाठी तुमच्याकडे जे काही पॅटर्न येतील त्याबद्दल तुम्ही त्यांना माहिती देऊ शकता. जसेजसे ते शिवणकामात पारंगत होतील तसे तुम्ही त्यांना तुमच्या हाताखाली मदतीला घेऊ शकता. त्यामुळे त्यांना अजून चांगले शिकायला मिळेल आणि तुम्हाला सुद्धा चांगले कारागीर घरच्या घरी मिळून जातील.

जसजसा तुमचा Sewing business चांगला सेट होतील तुम्ही तसा स्वतःचा चांगला ब्रँड प्रस्थापित करून तुमच्या मालासाठी तुम्ही शहरामधून सुद्धा मागणी घेऊ शकता.

शिवाय ऑनलाईन च्या मदतीने तुम्ही हा Sewing business अजून मोठा करू शकता. ऑनलाईनसाठी सुरुवातीला तुमचा मालाचा प्रसार whatsapp, फेसबुक, इंस्टाग्राम द्वारे करून तुम्ही तुमच्या मालाला गिऱ्हाईक अजून मिळवू शकता.

तुम्हाला जेवढ्या जास्त चांगल्या प्रकारच्या variety कमीत कमी वेळेत आणि योग्य दरात देता येईल त्याप्रमाणे देऊन तुमचा ब्रँड चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये ग्रो करू शकता. मग तुम्हाला शिवणकाम कारचयचय तर लगेचच तुम्ही ह्याची सुरुवात करा.

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Hobart-Au11 low-carb breakfast recipes that taste good11 Easy paleo recipesRefreshing and healthy green smoothie11 Fast food restaurant to eat in Nashville, Tennessee
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Hobart-Au11 low-carb breakfast recipes that taste good11 Easy paleo recipesRefreshing and healthy green smoothie11 Fast food restaurant to eat in Nashville, Tennessee