शेतमाल तारण योजना I Shetmal Taran Yojana

शेतमाल तारण योजना I Shetmal Taran Yojana

शेतकऱ्यांना चांगला बाजार भाव मिळावा यासाठी शेतमाल तारण योजना(Shetmal Taran Yojana) सुरू करण्यात आली.

शेतकऱ्यांना गरजेपोटी शेतमाल साठवण करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्यामुळे शेतीमधील माल काढणी हंगामात मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत शेतकरी पोहोचवतात. ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना बाजार भाव व्यवस्थित मिळत नाही व कमी दरामध्ये सर्व शेतमाल विकावा लागतो.

परंतु जर शेतमाल व्यवस्थितपणे शेतकऱ्यांची साठवणूक करून काही कालावधीनंतर हळूहळू बाजारपेठेत विक्रीसाठी आणला तर त्यांना शेतमालासाठी चांगला बाजार भाव मिळू शकतो.

शेतमाल तारण योजना (Shetmal Taran Yojana) या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बाजार समितीच्या गोदामा मध्ये शेतमाल ठेवण्यासाठी तारण कर्ज देण्यात येते. ज्या अंतर्गत शेतकरी त्या गोदामामध्ये तारणाद्वारे शेतमाल ठेवून देतात.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
आदिवासी उमेदवारांसाठी सेवा योजना प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्र
अपंगाचे शिक्षण, प्रशिक्षण व पुनर्वसन योजना

शेतकऱ्यांना तारण कर्ज खालील गोष्टींसाठी देण्यात येते

या योजनेअंतर्गत राज्य व केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदाम पावती द्वारे देखील शेतकऱ्यांना तारण कर्ज देण्यात येते.

या योजनेमध्ये तूर, डाळ, मूग, डाळ, सोयाबीन, सूर्यफूल, चना, डाळ, उडीद, डाळ, भात, ज्वारी, बाजरी, मका, करडई, घेवडा, गहू, काजू बी, बेदाणे, हळद, सुपारी इत्यादी मालांचा समावेश करण्यात आला आहे.

ही योजना बाजार समित्यांमार्फत राबवली जात असून सहा महिन्याच्या आत जर तारण कर्जाची परतफेड बाजार समितीने केली तर त्यांना तीन टक्के व्याजामध्ये सवलत देण्यात येते. कृषी पणन महामंडळाने या योजनेअंतर्गत 1990-91 ते 2020- 21 अखेरपर्यंत एकूण 23 हजार 885.15 लाख इतके कारण कर्जाचे वाटप केले आहे.

सोयाबीन, तूर, उडीद, भात, मूग, चना, सूर्यफूल, ज्वारी, बाजरी, मका, गहू, या शेतमालासाठी कर्ज वाटपाची मर्यादा एकूण कमी किमतीच्या 75 टक्के रक्कम देण्यात येते. याची मुदत सहा महिने असून व्याजदर 6% असा आहे.

वाघ्या घेवडा म्हणजे राजमा यासाठी कर्ज वाटपाची मर्यादा एकूण किमतीच्या 75 टक्के रक्कम किंवा तीन हजार रुपये प्रतिक्विंटल यापैकी कमी असणारे रक्कम आणि यासाठी पद्धत सहा महिने आणि व्याजदर सहा टक्के असा आहे.

काजू बी यासाठी कर्ज वाटपाची मर्यादा एकूण किमतीच्या 75 टक्के रक्कम किंवा 100 रुपये प्रतिक्विंटल यापैकी कमी असणारे रक्कम आणि यासाठी पद्धत सहा महिने आणि व्याजदर सहा टक्के असा आहे.

सुपारी यासाठी कर्ज वाटपाची मर्यादा एकूण किमतीच्या 75 टक्के रक्कम किंवा 100 रुपये प्रतिक्विंटल यापैकी कमी असणारे रक्कम आणि यासाठी पद्धत सहा महिने आणि व्याजदर सहा टक्के असा आहे.

बेदाणा यासाठी कर्ज वाटपाची मर्यादा एकूण किमतीच्या 75 टक्के रक्कम जास्तीत जास्त किंवा 7500 रुपये प्रतिक्विंटल यापैकी कमी असणारे रक्कम आणि यासाठी पद्धत सहा महिने आणि व्याजदर सहा टक्के असा आहे. [Shetmal Taran Yojana]

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Launceston-Au10 Easy weeknight dinners11 Easy Banana bread you should try!11 Easy lasagna recipe you should try!This Beetroot Smoothie to Glow your Skin
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Launceston-Au10 Easy weeknight dinners11 Easy Banana bread you should try!11 Easy lasagna recipe you should try!This Beetroot Smoothie to Glow your Skin