श्रीकृपानिधे विश्वनायके अष्टक । Srikripanidhe Vishwanayake Ashtak
श्रीकृपानिधे विश्वनायके अष्टक (Srikripanidhe Vishwanayake Ashtak) हे श्री रेणुकादेवीचे अष्टक आहे.
अश्विन शुद्ध प्रतिपदा दिवशी किंवा नियमित हे अष्टक म्हणावे.
श्रीकृपानिधे विश्वनायके । हे भवानि सौभाग्यदायके ॥
प्रार्थितों तुला मी पदोपदी
रेणुके! मला पावसी कधी ? ॥ १ ॥
पापि मी तुझ्या द्वारि तिष्ठतो ।
येऊ दे कृपा फार कष्टतो
आटली कृपेची नसे नदी || २ ॥
लागलीस तूं कां दडावया ।
धांव लागलों मी बुडावयाला ॥
नावरेचि संसार वारधी ॥ ३ ॥
काम क्रोध हे मान मोडिती ।
प्राणसंकटा माजि पाडिती ॥
ओढिती जसे फासि पारधी ॥ ४ ॥
चिंतनेंत आयुष्य दाटलें ।
पंचप्राण कंठांत दाटले ||
क्षीण जाहली शक्ति आगदीं ॥ ५ ॥
अंतकाळ हा शत्रु आगळा ।
कापिल्याविना राहिना गळा ॥
पीडिताति व्याधी शतावधी ॥ ६ ॥
अमूल्य तारुण्य वेचले ।
हे समीप वार्धक्य पोहोचले ॥
काय उरली सांग अवधी ॥ ७॥
चित्तींची आशा चित्ती राहिली ।
वाट म्यां तुझी फार पाहिली ॥
सारं का? न ये मंथितां दधी ॥ ८॥
यात्रया दया लागेना क्षण।
अंग हे तुझ्या माय लक्षण ॥
गर्जुनी स्वये साक्ष दे विधी ॥ ९॥
पावली कृपेने कृपावती ।
विष्णुदास ही देत पावती ॥
नाम कीर्तनी भक्ती दे सुधी॥ १०॥