सुटलेले पोट कमी करण्यासाठी घरगुती उपाय l Sutlele Pot Kami Karnyasathi Gharghuti Upay

सुटलेले पोट कमी करण्यासाठी घरगुती उपाय l Sutlele Pot Kami Karnyasathi Gharghuti Upay

आजकाल आपण पाहतो की बऱ्याच जणांचे पोट सुटलेले दिसते. पोट सुटले की सर्वजण बरेच पथ्य पाळतात किंवा काही खाण्याच्या टिप्स शोधत (Sutlele Pot Kami Karnyasathi Gharghuti Upay) असतात.

Sutlele Pot Kami Karnyasathi Gharghuti Upay
Sutlele Pot Kami Karnyasathi Gharghuti Upay

पोट सुटण्याची कारणे बरच असू शकतात. परंतु पोट सुटले की आहारामध्ये तुम्ही वेगळे काय घेता आणि तुम्ही नियमित व्यायाम करता का हे देखील पाहणे आवश्यक आहे.

त्यामुळे तुम्ही जर बसून काम करत असाल किंवा तुमचा व्यायाम अजिबातच दिवसभर होत नसेल तर तुमचे पोट नक्कीच सुटणार. शिवाय काही लोक मध्यपान करतात. त्यामुळे देखील पोट सुटते.

काही जणांचे काम बसून असल्यामुळे त्यांचे पोट सुटलेले असते किंवा काही जण जंक फूड अतिशय प्रमाणात खातात. तेलकट आणि बाहेर खाणे जास्त प्रमाण असल्यामुळे देखील पोट सुटू शकते. त्यामुळे या व्यतिरिक्त देखील आणखी बरीच कारणे असू शकतात.

तुम्हाला जर याविषयी घरगुती काही टिप्स हव्या असतील, ज्यामुळे तुम्हाला थोडाफार आहारामध्ये बदल करून तुमचे सुटलेले पोट कमी करायचे असेल तर इथे काही अशा टिप्स दिल्या आहेत, ज्या तुम्हाला नियमित आहार मध्ये उपयोगी पडतील.

तुम्ही वैद्यकीय सल्ला किंवा डॉक्टरांच्या मदतीने देखील तुमच्या आहारामध्ये बदल करून त्याप्रमाणे सुटलेले पोट कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

लक्षात घ्या की कोणतीही शारीरिक समस्या असेल तर प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि नंतरच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बदल करावेत.

इथे केवळ महत्वपूर्ण अशी माहिती आणि जे घरगुती उपाय आहेत ते दिले आहेत जे तुम्हाला थोडेफार मदत करते. तर चला पाहूया कोणत्या अशा दहा गोष्टी आहेत ज्या तुम्ही आहारामध्ये घेतल्या तर तुम्हाला त्याचा फायदा होईल.

दही

रोजच्या आहारात वापरल्या जाण्याऱ्या दह्यामध्ये कॅल्शिअम मोठ्या प्रमाणावर आढळून येते यामध्ये असणारे कॅल्शिअम फॅट्स वाढवणारे हार्मोन्स संतुलित ठेवते. त्यामुळे सुटलेल्या पोटावर नियंत्रण आणण्यासाठी ‘दही’ हा उत्तम उपाय आहे.

काकडी

रोज जेवणाआधी आहारामध्ये काकडीचा सामावेश करावा काकडीमध्ये फायबर, मिनरल, व्हीटॉमिन आणि पाणी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे शरीरांतील टॉक्सिन्स् बाहेर पडायला मदत होते.

टॉमेटो

टॉमेटोचे सूप किंवा सॅलेड सुटलेले पोट नियंत्रणात आणण्यासाठी अतिशय उपयुक्तअसते. टॉमेटोमध्ये फॅट्स कमी करणारे घटक मोठ्या प्रमाणावर असतात.

लसूण

रोज सकाळी 4-5 कच्च्या लसणीच्या पाकळ्या खाव्यात. त्यावर एक ग्लास पाणी प्यावे. यामुळे शरीरातील फॅट्स बर्न होण्यास मदत होते.

बडीशेप

जेवणानंतर रोज एक चमचा बडीशेप खाणे फायद्याचे ठरते. बडीशेपेमध्ये फायबर, आयर्न, मॅग्नेशिअम मोठ्या प्रमाणात असते त्याचा उपयोग पचनशक्ती वाढवण्यास होतो.

सोयाबिन

आपल्या आहारामध्ये सोयाबिनचा वापर करणे उपयुक्त असते सोयाबिनमध्ये असणारे घटकांमुळे अतिरीक्त भूक नियंत्रणात येते.

मासे

माशांमध्ये ओमेगा 3 आणि प्रोटीन असते त्यामुळे भूक संतुलित राखण्यास मदत होते. माशांचा उपयोग आठवड्यातून एकदा आहारात नक्की करावा.

अननस

अननसामध्ये अत्यंत गुणकारी घटक असतात अननसातील या घटकांमध्ये पोट कमी होण्यास मदत होते.

दूध

एका सर्वेक्षणानुसार असे आढळून येते की दूधामधील कॅल्शिअम शरीरातील फॅट्स कमी करण्यास उपयुक्त ठरते. त्यामुळे रोज रात्री एक ग्लास दूध पिणे फायद्याचे ठरते.

अळशी

अळशी ह्या घटकामध्ये आयर्न तसेच ओमेगा 3 आढऴून येते अळशी खाल्ल्यामुळे पोट कमी होण्यास मदत होते. इतकेच नाही तर मधूमेह, अल्जायमर आणि कॅन्सरचा होण्याचा धोकाही कमी होतो. रोज एक चमचा अळशी किंवा अळशीची चटणी खाणे फायद्याचे ठरते.

हे सर्व उपाय घरगुती तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये अगदी सहजपणे करण्यासारखे आहेत. तुम्हाला जर खरंच वजन कमी करायचे असेल तर प्रथम तुम्ही वैद्य सल्ला जरूर घ्यावा व त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आहारामध्ये किंवा डायट मध्ये बदल करावा.

परंतु नियमित जो आहार घेत असाल तो आहार तसाच ठेवावा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की जंक फूड आणि बाहेरचे खाणे टाळावे. ज्यामुळे पोट वाढते आणि घरामध्ये जे उपलब्ध असेल तेच आहारामध्ये व्यवस्थितपणे घ्यावे. त्यामुळे तुमच्या आहार जर मेंटेन झाला तर तुमचे वजन देखील चांगले मेंटेन राहील.

शेवग्याच्या पानांचे (मोरिंगा पावडर ) त्वचेसाठी फायदे l Benefits of moringa leaves for skin

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय । Home Remedies to Increase Immunity

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय । Home Remedies to Increase Immunity

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Bendigo-Au11 Best all inclusive resorts in Ballarat-Au9 Fruits that are Powerhouses of Vitamin CDo you know these variety of Tomatoes11 Secrets of Spinach Green Smoothie to get Glowing Skin
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Bendigo-Au11 Best all inclusive resorts in Ballarat-Au9 Fruits that are Powerhouses of Vitamin CDo you know these variety of Tomatoes11 Secrets of Spinach Green Smoothie to get Glowing Skin