मिठाई व्यवसाय । Sweet shop business in Marathi

मिठाई व्यवसाय । Sweet shop business in Marathi

शुभप्रसंगी आपण मिठाई आणतो. मग त्यावेळी सर्वांना मिठाई दिली जाते. शुभप्रसंग कोणताही असो. कुणाला चांगली नोकरी मिळाली किंवा कुणी शाळेमध्ये पहिल्या नंबर ने पास झाले. अशा विविध प्रसंगी आपण मिठाई आणतो आणि प्रथम देवाला प्रसाद ठेवून आपल्या आजूबाजूच्या लोकांना, मित्र मैत्रिणींना खायला देतो.

Sweet-shop-business
Sweet shop business

सणासुदीला देखील आपण मिठाई विकत घेतो. कधी कधी तर सहजच मिठाई खावीशी वाटली तरी आपण मिठाई आणतो. तर अशा मिठाईच्या व्यवसायाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

Sweet shop business सर्वांना परिचित असेलच. आणि सर्वांना माहीत आहे की मिठाईचा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालू शकतो. अगदी तुम्ही एखादी मिठाई जरी विकली तरी त्याची ख्याती झाली तर तो व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही वाढवू शकता.

जसे तुम्हाला माहीत आहे की चितळे ह्यांची काजू कतली किती प्रसिद्ध आहे. तसेच साताऱ्याचे कंदी पेढे, बेळगांव चा कलाकंद वगैरे अशा कितीतरी मिठाई ह्या त्या शहरातील एक प्रसिद्ध मिठाई आहेत. आणि जर अशी मिठाई बनवून तुम्ही देखील मोठ्या प्रमाणात व्यवसाय केला तर नक्कीच तुम्हाला चांगला फायदा मिळेल .

मिठाई तयार करण्यासाठी एक गोष्ट महत्वाची असते ती म्हणजे मिठाई ही चांगल्या गुणवत्तेची असली पाहिजे. जर मिठाई चांगल्या गुणवत्तेची नसेल तर त्याला मागणी मिळणे थोडे अवघड आहे. त्यामुळे मिठाई जशी चविष्ट असावी तशी ती चांगल्या प्रतीची असणे देखील आवश्यक आहे.

तर चला पाहूया की Sweet shop business चालू करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे.

कोणताही व्यवसाय चालू करण्यासाठी त्या व्यवसायाबद्दल रिसर्च करणे आवश्यक आहे. त्यानंतर रिसर्च करून त्याप्रमाणे प्लॅनिंग करणे आवश्यक आहे. ह्या सर्व गोष्टी लक्षात आल्यानंतर Sweet shop business साठी लागणारे मटेरियल मशीन आणि खर्च ह्याबद्दल नीटपणे प्लॅन तयार ठेवून त्याप्रमाणे एकेक स्टेप पुढे सरकणे आवश्यक आहे.

मिठाई व्यवसायाची सुरुवात कशा प्रकारे कराल । How you will start Sweet Mart business

Sweet shop business सुरू करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कोणत्या प्रकारची मिठाई तुम्ही विकायला ठेवणार आहे हे पाहणे आवश्यक आहे. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाईची एक यादी तयार करून ठेवू शकता. त्याप्रमाणे त्या मिठाई बनवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी पाहणे आवश्यक आहे.

ह्या सर्व गोष्टींचा व्यवस्थितपणे रिसर्च करून नंतर पुढच्या कामासाठी तुम्ही स्टेप घेवू शकता. जर तुम्ही Sweet shop business franchisee म्हणून करणार असाल तर त्यासाठी लागणारी गुंतवणूक आणि खर्च ह्याविषयी व्यवस्थितपणे माहिती काढून घेणे आवश्यक आहे.

मिठाई व्यवसाय चालू करण्याआधी मार्केट रिसर्च । Market research before starting a Sweet Mart business

कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रथम त्याबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. ती माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम मार्केटमध्ये स्वतः जावून तिथून माहिती गोळा करणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही कोणकोणत्या प्रकारची मिठाई तयार करणार आहात हे पाहून त्याची मार्केटमध्ये मागणी आहे का हे पाहणे आवश्यक आहे.

लोकांना नक्की काय हवे आहे आणि कशा प्रकारे हवे आहे याप्रमाणे तुम्ही मिठाई तयार करू शकाल. त्यामुळे तुमचा Sweet shop business चांगल्या रीतीने चालू शकेल.

अशा रीतीने रिसर्च केल्यानंतर त्या मिठाईसाठी तुम्हाला फायदा होवू शकतो का आणि ती इतरापेक्षा चांगली खपू शकेल का हे देखील पाहणे आवश्यक आहे.

मिठाई व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल । Raw material required for Sweet Mart business

मार्केट रिसर्च आणि मिठाईसाठी सर्व माहिती घेतल्यानंतर त्यासाठी लागणारा कच्चा माल तुम्ही कमी किमतीमध्ये कसा मिळेल ह्याबद्दल माहिती काढणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही मार्केटमध्ये जावून पाहून होलसेल मालाची चौकशी करून योग्य दरात कुठून माल मिळेल हे पहावे.

शक्यतो कच्चा माल नजीकच्या होलसेल मार्केटमध्ये जावून घेणे जास्त योग्य ठरेल. कारण इतर ठिकाणाहून जर माल घेतला तर तो माल आणण्यासाठी तुम्हाला वाहनाचा खर्च द्यावा लागेल. आणि माल चढविण्यासाठी आणि उतरवण्यासाठी कामगाराची आवश्यकता पडू शकेल.

मिठाई व्यवसायासाठी लागणारे उपकरण । Equipment for Sweet Mart business

कच्चा मालानंतर तुम्हाला मिठाई तयार करण्यासाठी उपकरणांची आवश्यकता आहे. मिठाई तयार करण्यासाठी गॅस, मोठी कढयी, चमचे, मिठाई ठेवण्यासाठी फ्रिज अशा विविध वस्तूंची आवश्यकता आहे.

तुम्ही जर हा Sweet shop business मोठ्या प्रमाणामध्ये वाढवणार असाल तर त्यासाठी तुम्ही मिठाई तयार करण्यासाठी मशीन देखील खरेदी करू शकता. पण सुरुवातीला तुम्ही छोट्या प्रमाणात व्यवसाय करणार असाल तर त्यासाठी तुम्ही घरातील सर्व साहित्य अतिरिक्त असेल ते वापरू शकता.

मिठाई व्यवसाय सुरू करण्यासाठी जागा । A place to start a Sweet Mart business

मिठाईचा किंवा कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जागेची आवश्यकता भासू शकते. त्यासाठी तुम्ही कोणतीही जागा निवडताना मार्केट आहे का आणि लोकांची वर्दळ जिथे असेल अशा ठिकाणी जागा विकत किंवा भाडे तत्वावर घेणे आवश्यक आहे.

तुम्ही हा व्यवसाय सुरुवातीला घरातून सुरू केला तरी चालू शकतो. पण मार्केटमध्ये जर तुम्ही एखादे शॉप घेतले तर हा Sweet shop business चांगल्या पद्धतीने वाढू शकतो. ज्यामुळे तुम्हाला जास्त गिऱ्हाईक मिळेल आणि त्यामुळे तुम्हाला ह्यापासून भरपूर फायदा होईल.

मिठाई व्यवसायासाठी लागणारे पॅकेजिंग । Packaging required for Sweet Mart business

मिठाई तयार झाल्यानंतर ती चांगल्या रीतीने पॅक करणे देखील आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही छोटे छोटे बॉक्स तुमच्या ब्रँडचे पॅकेजिंग कंपनीकडून तयार करून घेवू शकता. त्याच्यामुळे तुमच्या दुकानाचा प्रचार होईल आणि फायदा हळूहळू वाढत जाईल.

पॅकेजिंग करण्यासाठी तुम्ही स्वतःची मशीन देखील बसवू शकता.त्यामुळे तुम्ही पॅकिंग मटेरियल स्वतःच्या जागेमध्ये तयार करून एखादे कामगार पॅकिंग करण्यासाठी ठेवू शकता.

मिठाई दुकान चालवण्यासाठी कर्मचारी । Employees to run a Sweet Mart business

मिठाई दुकान सुरू केल्यानंतर माल विकत देण्यासाठी तुम्हाला कर्मचारी ठेवणे आवश्यक आहे. सगळे काम तुम्ही एकटे करू शकत नाही. त्यासाठी सामना पॅकिंग करण्यासाठी आणि सामान विकत देण्यासाठी असे कर्मचारी ठेवू शकता. तसेच तुम्हाला मिठाई बनवण्यासाठी चांगला उत्कृष्ट कूक किंवा कारागीर देखील ठेवणे आवश्यक आहे. जो तुमच्या मिठाईची गुणवत्ता आणि चव चांगली ठेवेल.

तुम्ही सुरुवातीला जर घरच्यांची मदत घेणार असाल तर तेदेखील उत्तम ह्यामुळे तुम्हाला कर्मचाऱ्याला द्यायला लागणारा पगार देखील वाचेल. आणि घरचे सोबत असल्यामुळे काम देखील व्यवस्थितरीत्या पार पडेल. त्यामुळे तुम्हाला जास्त लक्ष देखील द्यावे लागणार नाही. जसा तुमचा फायदा वाढेल तसे मग तुम्ही हळूहळू कामासाठी तुमच्या विश्वासू आणि ओळखिमधील कामगार देखील ठेवू शकता l.

मिठाई व्यावयासाठी लागणारे लायसेन्स आणि रजिस्ट्रेशन । License and registration required for the sale of sweets

Sweet shop business सुरू करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला GST रजिस्ट्रेशन करून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्ही शॉप ॲक्ट देखील बनवू शकता. जर तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये हा व्यवसाय करणे असाल तर त्यासाठी तुम्ही इतर ब्रँड, ट्रेडमार्क लायसेन्स देखील घेवू शकता. तुम्हाला करंट बँक खाते आणि फूड लायसेन्स देखील आवश्यक आहे. FSSAI हे फूड लायसेन्स तुम्ही घेवू शकता.

मिठाई व्यवसायासाठी मार्केटिंग । Marketing for Sweet Mart business

Sweet shop business सुरू केल्यानंतर त्याची मार्केटिंग देखील करणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही आजूबाजूच्या दुकानामध्ये बॅनर लावू शकता. त्यानंतर शिवाय तुम्ही व्हॉट्सअँप क्या मदतीने तुमच्या स्वीट मार्ट बद्दल माहिती देवू शकता. शिवाय तुम्ही एका मिठाई सोबत दुसरी मिठाई घेतल्यास थोडेफार डिस्काउंट देखील देवू शकता. तुमच्या मालाची गुणवत्ता आणि चव इतारापेक्षा चांगली असेल तर तुमच्या मिठाई साठी हळूहळू चांगले गिऱ्हाईक मिळेल आणि आपोआप तुमचा व्यवसाय चांगल्या रीतीने चालू शकेल.

मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय वाढल्यानंतर तुम्ही ह्याची मार्केटिंग नजीकच्या कंपन्या किंवा मोठ्या प्रमाणामध्ये ऑनलाईन देखील करू शकता.

Sweet shop business तुम्हाला थोडी जोखीम घेण्याची आवश्यकता आहे. कारण मिठाई व्यवसायासाठी तुम्हाला योग्य रीतीने प्लॅन करून त्यानंतर हा व्यवसाय सुरू करण्याची आवश्यकता आहे. पण हा व्यवसाय जर चांगल्या रीतीने चालू लागला तर हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा व्यवसाय वाढू शकतो. म्हणून व्यवसाय सुरू करण्याआधी सर्वप्रथम तुम्ही त्यासाठी योग्य प्लॅनिंग करणे आवश्यक आहे. नंतरच तुम्ही ह्यामध्ये पुढे पावूल ठेवून एकेक स्टेप पुढे सरकून व्यवसाय चांगल्या रीतीने वाढवू शकता.

द्राक्षे बाग किंवा मनुका व्यवसाय । Kishmish business in Marathi

मधमाशी पालन व्यवसाय । How to start a bee-keeping business in Marathi

Cold pressed Oil व्यवसाय । How to start Cold pressed Oil business in Marathi

कपड्यांचा व्यवसाय Clothing business in Marathi

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Roanoke-Va11 Delicious Recipes to Bake It Better30-minute recipes you can try11 plants which are most popular in UsThe Plant That Brings Good Luck and Prosperity
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Roanoke-Va11 Delicious Recipes to Bake It Better30-minute recipes you can try11 plants which are most popular in UsThe Plant That Brings Good Luck and Prosperity