टी-शर्ट प्रिंटिंग उद्योग । T-shirt-printing business in Marathi

टी-शर्ट प्रिंटिंग उद्योग । T-shirt-printing business in Marathi

T-shirt-printing business हा एक अतिशय चांगल्या रीतीने घरून करता येणार उद्योग आहे. सध्या वेगवेगळ्या प्रिंट्समध्ये टी-शर्टची मागणी खूप आहे. आपण जर अशा प्रकारे घरून टी-शर्ट प्रिंट करून आपला नफा कमवू शकता. त्यासाठी तुम्हाला काही मशीन्सची गरज लागेल.

त्या तुम्ही घरीबसल्या मागवून घेऊ शकता. आणि मशीनसाठी तुम्हाला जास्त जागेची गरज सुद्धा लागत नाही. ह्या मशीनद्वारे तुम्ही अजूनसुद्धा बऱ्याच वस्तू प्रिंट करून विकू शकता. तुम्ही सुरुवात टी-शर्ट पासून करून नंतर इतर वस्तूदेखील विकून नफा मिळवू शकता. तुम्हाला T-shirt-printing business मोठ्या कंपनीच्या ऑर्डर्स सुद्धा घेऊन तुमचा नफा अजून वाढवू शकता.

टी-शर्ट प्रिंटिंगसाठी लागणारी जागा । Place for T-shirt-printing business

तुम्हाला मशीनसाठी T-shirt-printing business चालू करण्यासाठी जास्त जागेची गरज लागत नाही. तुम्हाला ह्यासाठी तुम्हाला एखाद्या टेबलइतकी जागा लागते. हि मशीन अगदी छोटी म्हणजे तुमच्या कॉम्पुटरला जेवढी जागा लागते तेवढी मशीन असते.

तसेच तुम्हाला ह्याबरोबर लॅपटॉप आणि प्रिंटर ह्या दोन्ही गोष्टीसाठी सुद्धा एक छोटी जागा लागते. तुमच्याकडे जरी एक मोठा टेबल असेल तर त्यावर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ठेवू शकता. घरी एखाद्या छोट्या रूममध्ये तुम्ही तुमचा प्रिंटीगसाठी लागणारा सेटअप करू शकता.

प्रिंटिंगसाठी तुम्ही कोणकोणते प्रॉडक्ट्स घेऊ शकता । Which product you can use for printing?

प्रिंटिंगसाठी तुम्ही टी-शर्ट बरोबरच, मग, डिश अशा वस्तूसाठी सुद्धा तुम्ही डिझाईन्स तयार करून त्या प्रिंट करू शकता. ह्यामध्ये तुम्ही तुमच्या creativity प्रमाणे आपल्या वेगवेगळ्या डिझाईन्स तयार करून लॅपटॉपद्वारे प्रिंटरच्या मदतीने प्रिंट करून त्या ह्या वस्तूवर प्रिंटिंग मशीनच्या सहाय्याने प्रिंट करून विकू शकता.

तसेच तुम्ही कॅप्स, छोट्या वस्तू वर देखील डिझाईन्स प्रिंट करू शकता. शिवाय ह्यामध्ये तुम्हाला जास्त वेळ सुद्धा लागत नाही. आणि घरीबसल्या तुम्ही हे सर्व व्यवस्थितरित्या वस्तू तयार करून त्या विकू शकता. 

प्रिंटिंगसाठी तुम्हाला लागणारे साहित्य आणि त्यासाठी येणारा खर्च  । Raw Material and Price required for T-shirt-printing business

तुम्ही जर टी-शर्टसाठी डिझाईन्स प्रिंट करणार असाल तर तुम्हाला सर्वप्रथम प्लेन टी-शर्ट विकत घ्यावे लागतील. त्यानंतर प्रिंटिंगसाठी तुम्हाला एक लॅपटॉप लागेल.

लॅपटॉपवरून डिझाईन्स प्रिंट करण्यासाठी तुम्हाला एक कलर प्रिंटर लागेल. त्यानंतर टी-शर्टवर तुम्हाला डिझाईन्स प्रिंट करण्यासाठी एक Sublimation प्रिंटर लागेल. एवढ्या वस्तू सुरुवातीला तुम्हाला विकत घ्याव्या लागतील ज्याद्वारे तुम्ही तुमचे काम चालू करू शकाल.

प्लेन टी-शर्टसाठी तुम्हाला सुरुवातीला एखादा चांगला wholsaler शोधून काढावा लागेल. जो तुम्हाला कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त मटेरियल देऊ शकेल. तुमच्या नजीकच्या ठिकावरूनच तुम्ही होलसेलरची माहिती काढून एखादा चांगला विक्रेता निवडू शकता.

ज्यामुळे तुम्हाला लांबून माल घ्यावा लागणार नाही. त्यानंतर ह्या मशीन तुम्हाला नजीकच्या शहरामधून विकत घेऊ शकता. तसेच ह्या मशीन तुम्हाला ऑनलाईन सुद्धा मिळून जातील. अशा रीतीने तुम्ही तुमचा कच्चा माल घेऊन तुम्ही घरूनच तुमचा उद्योग चालू करू शकता.

तुम्ही होलसेल मालासाठी indiamart किंवा अजून बऱ्याच ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर आणि तुमच्या ओळखीने सर्व चौकशी करून कच्चा माल खरेदी करू शकता.

टी-शर्ट साधारणतः तुम्हाला ५० रुपयापासून मिळून जातील. ह्याच्या किंमतीत गुणवत्तेप्रमाणे थोडीफार वाढ होऊ शकते.

प्रिंटर तुम्हाला १२००० ते १५००० रुपयापर्यंत मिळू शकतो.

sublimation प्रिंटर पण तुम्हाला १२००० ते २०००० रुपयांमध्ये मिळू शकतो.

प्रिंटरसाठी लागणाऱ्या inks आणि पेपर्स ह्यासाठी २००० ते ३००० पर्यंत खर्च येऊ शकतो.

sublimation ink तुम्हाला २२०० रुपयापासून पुढे मिळेल ह्यामध्ये ६ कलर्सचा सेट असतो.

sublimation टेप १८० रुपयांमध्ये किंवा थोडीफार जास्त किमतीला मिळेल.

sublimation paper ३०० रुपयांमध्ये १०० शीट्स मिळून जातील.

अशा रीतीने तुम्हाला कच्चा मालासाठी एवढा खर्च करावा लागेल. त्याप्रमाणे तुम्ही सर्व खर्च लिहून काढून त्याप्रमाणे तुम्ही माल जिथून स्वतःत आणि ओळखीने चांगल्या गुणवत्तेचा मिळेल तिथून खरेदी करून तुम्ही तुमचे काम चालू करू शकता.

उद्योगासाठी लागणारे लायसन्स आणि रजिस्ट्रेशन । License and Registration to T-shirt-printing business

T-shirt-printing business साठी शॉप-ऍक्ट लायसन्स आणि GST रजिस्ट्रेशन लागेल. तसेच तुम्ही सरकारी कार्यालयात जाऊन चौकशी करून अजून कोणत्या लायसन्स आणि रजिस्ट्रेशन गरज लागणार आहे त्याप्रमाणे ते लायसन्स घेऊ शकता.

सुरुवातीला प्रथम तुम्ही GST रजिस्ट्रेशन करूनसुद्धा तुमचा T-shirt-printing business चालू करू शकता. जसा तुमचा उद्योग वाढेल तसे तुम्ही इतर लागणारे लायसन्स आणि रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता.

टी-शर्ट वर डिझाईन्स प्रिंटिंगची प्रोसेस । Printing design process on T-shirt

प्रथम तुम्हाला एक डिझाईन तयार करून किंवा एखादा फोटो जो तुम्हाला टी-शर्ट वर प्रिंट करायचा आहे तो प्रिंट करून घ्यावा लागेल. ह्यासाठी तुम्ही तुमच्या लॅपटॉपद्वारे एखादी डिझाईन सिलेक्ट करून ती sublimation पेपर वर A-४ साईझमध्ये प्रिंट करून घ्यावी. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कलर सिलेक्ट करून प्रिंटरमध्ये इंक वापरावी.

त्यानंतर sublimation प्रिंटर ला on करून त्याचे temperature सेट करून घ्यावा. तुम्हाला जो टी-शर्ट प्रिंटसाठी आहे तो घेऊन तो मशीनच्या प्रिंटिंग बेस वर ठेवावा. तुमची प्रिंट बरोबर टी-शर्टच्या सेन्टरला येईल त्याप्रमाणे टी-शर्ट adjust करावा. नंतर तुम्ही जे डिझाईन पेपरवर प्रिंट केले आहे ते डिझाईन टी-शर्टवर सेन्टरला ठेवावे. वरून प्रिंटरचा  बेस प्रेस करून हॅन्डलने प्रेस करावे. अ

अशा रीतीने तुमच्या टी-शर्टवर तुम्ही easily कोणतेही डिझाईन प्रिंट करून घेऊ शकाल. तुम्हाला temperature च्या सेटिंग्स कशा कराव्या लागतील ह्याचा चार्ट मशीनच्या मॅन्युअल बरोबर मिळून जाईल. प्रत्येक वस्तूसाठी तुम्हाला वेगवेगळे temperature सेट करावे लागेल.

टी-शर्ट मध्ये तुम्ही शक्यतो डिझायनसाठी light कलर्सचे टी-शर्ट प्रिंट केले तर ते जास्त आकर्षक दिसतील. डार्क रंगाच्या टी-शर्टवर डिझाईन्स तेवढ्या आकर्षक दिसणार नाहीत. जर तुम्ही पांढऱ्या रंगाचे टी-शर्टवर डिझाईन्स प्रिंट्स जास्त आकर्षक दिसतात. तुम्ही ह्याप्रमाणे डिझाईन्स प्रिंट करून काय फरक आहे ते पाहू शकता. 

तुम्हाला sublimation प्रिंटर मध्ये ५ इन १ ऑपशन्स मिळतात. ज्यामध्ये तुम्ही टी-शर्ट, कॅप, टी-मग, छोट्या डिश, मोठ्या डिश अशा प्रकारच्या वस्तू डिझाईन प्रिंट करण्यासाठी वापरू शकता. प्रत्येक शेपसाठी वेगवेगळे मशीन बेस मिळतात. त्याप्रमाणे ते मशीनला जोडून आणि त्याप्रमाणे temperature सेट करून तुम्ही वेगवेगळ्या  वस्तूसाठी आकर्षक स्वतःच्या डिझाईन्स तयार करून त्या वस्तूवर प्रिंट करून विकून चांगला नफा कमवू शकता.

टी-शर्ट साठी प्रोडक्शन आणि पॅकेजिंग । production and packaging to T-shirt-printing business 

टी-शर्ट साठी किंवा इतर वस्तूंचे प्रिंटिंग तुम्ही करणार असाल तर तुम्ही सुरुवातीला तुम्हाला जशा ऑर्डर्स येतील त्याप्रमाणेच डिझाईन्स प्रिंट करून टी-शर्ट किंवा वस्तू विकू शकता. जशी तुमची मागणी वाढेल तसे मग तुम्ही एक्सट्रा डिझाईन्स प्रिंट करून ठेवू शकता.

त्यासाठी तुम्ही अगोदरच लागणारा कच्चा माल (प्लेन टी-शर्ट) जास्त मागवून साठा करून ठेवू शकता. मग जशा तुमच्याकडे जास्त ऑर्डर्स येतील तसे तुम्ही लगेचच डिझाईन्स प्रिंट करून देऊ शकाल. ह्यासाठी लागणाऱ्या बऱ्याच डिझायन्सच्या variety सुद्धा तुम्ही तयार करून ठेवू शकता. म्हणजे नंतर ज्यावेळी मोठी ऑर्डर तुम्हाला मिळेल आणि त्याची जर urgent डिलिव्हरी करायची असेल तर तुम्हाला कुठल्या गोष्टीसाठी थांबावे लागणार नाही. तुमच्याकडे सर्व गोष्टी तयार असतील. फक्त तुम्हाला मटेरियल प्रिंट करून घेऊन पॅक करावे लागेल.

पॅकेजिंगसाठी तुम्ही सुरुवातीला पेपर बॅग्स किंवा बॉक्सेस होलसेलमधून विकत घेऊन तुमचा माल पॅकेज करून देऊ शकता. मोठ्या ऑर्डर्ससाठी तुम्ही corrugated मोठे बॉक्स वापरू शकता. तसेच तुम्ही माल दुसर्याकडूनसुद्धा पॅकेज करून घेऊ शकता. किंवा तुमच्याकडे मदतीला पॅकेजिंगसाठी कामगार ठेवून त्यांच्याकडून मटेरियल पॅक करू शकता. 

टी-शर्ट साठी प्रोडक्शनसाठी स्टाफ । staff for t-shirt production

टी-शर्ट साठी प्रोडक्शनसाठी तुम्हाला तुमचा स्टाफ तुमच्या ऑर्डर्स जशा मिळत जातील त्याप्रमाणे वाढवू शकता. जर तुम्ही कुणाकडून ते काम करून घेणार असेल तर ज्याला technical गोष्टी कळतील आणि जो चांगल्या डिझाईन्स तयार करून त्या टी-शर्टवर प्रिंट करन देत असेल तर त्याला तुम्ही ठेवून काम चालू करू शकता.

पॅकेजिंगसाठी तुम्ही एखादा व्यक्ती कामाला ठेवू शकता. सुरुवातीला तुमच्याकडे कमी ऑर्डर्स असतील तर आणि तुम्हाला ह्या सर्व गोष्टी करण्यात आवड असेल तर तुम्ही स्वतः ह्या गोष्टी करू शकता. आणि तुमचे काम चालू करू शकता.  

टी-शर्ट साठी मार्केटिंग । marketing for t-shirt printing business

टी-शर्ट साठी मार्केटिंग करण्यासाठी सुरुवातीला एक तुमचे प्रोडक्शन टार्गेट आणि मार्केटिंग प्लॅन तयार करून त्याप्रमाणे मार्केटिंग करू शकता. त्यासाठी तुम्ही तुमच्या प्रोड्क्टसना amazon सारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर रजिस्टर करून तुमचे ऑनलाईन स्टोर तयार करू शकता.

तुम्ही तुमच्या मालाची मार्केटिंग social मीडियाद्वारे सुद्धा करू शकता. जसे कि फेसबुक, व्हाट्सअँप, इंस्टाग्राम द्वारे तुमचे प्रॉडक्ट्स लोकांना दाखवून त्यांना त्याबद्दल माहिती देऊन ते प्रॉडक्ट्स तुमच्याकडून खरेदी करू शकतात.

तसेच तुम्ही वेगवेगळ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन जाहिरातीद्वारे तुमचा T-shirt-printing business अजून वाढवू शकता. ह्यासाठी तुम्ही एखादा चांगला मार्केटिंग सर्विस साठी agency ची मदत घेऊ शकता. ज्या ऑनलाईन मार्केटिंगची सर्विस तुम्हाला देऊन तुमचा उद्योग अजून वाढवण्यास तुम्हाला मदत करतील. अशा रीतीने तुमच्या प्रोडूक्टस्ची मार्केटिंग करून तुम्ही तुमचा उद्योग चांगल्या प्रकारे वाढवू शकता.

टी-शर्ट प्रिंटिंग व्यवसाय फायदेशीर आहे का?

हो टी-शर्ट प्रिंटिंग हा व्यवसाय (T-shirt-printing business) फायदेशीर आहे. कोणताही व्यवसाय चिकाटीने आणि व्यवस्थित प्लॅन करून केला तर त्यामध्ये तुम्ही नक्की यशस्वी व्हाल.

मी माझा स्वतःचा टी-शर्ट व्यवसाय कसा सुरू करू?

स्वतःचा टी-शर्ट व्यवसाय (T-shirt-printing business) चालु करण्यासाठी टी-शर्ट प्रिंटिंग मशिनरी विकत घेऊन नंतर व्यवस्थित प्लॅन करून व्यवसाय सुरु कराल.

टी-शर्ट छपाई भारतात फायदेशीर आहे का?

हो टी-शर्ट ला भारतात देखील तेवढीच मागणी आहे. त्यामुळे टी-शर्ट छपाई भारतात फायदेशीर आहे.

टी-शर्टवरील नफ्याचे मार्जिन किती आहे?

टी-शर्टवरील नफ्याचे मार्जिन हे तुम्हाला ठरवावे लागते. टी-शर्ट मार्केटमध्ये ज्या रेटमध्ये विकले जातात त्याप्रमाणे तुम्ही तुमचे मार्जिन ठरवु शकता.

तुम्ही घरी टी-शर्ट प्रिंट करू शकता का?

तुमच्या घरी जर जागा भरपुर असेल तर तुम्ही घरी टी-शर्ट प्रिंट करू शकता.

मी माझा टी-शर्ट नफ्यासाठी कसा विकू शकतो?

तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन व्यवसाय विकू शकता.

पैसे कमावण्यासाठी Teespring | Teespring business in Marathi

मिशो रिसेलर ऑनलाईन व्यवसाय आणि माहिती। Meesho Reseller Online Business in marathi

बेकिंग केक्स एक चांगला उद्योग । Cake baking business in Marathi

छोटा स्नॅक सेंटरचा उद्योग | Snack Center business in Marathi

शेती उद्योग | Farming business in Marathi

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Sunshine Coast-Au12 Dessert Recipes for the Mediterranean No-Sugar DietThe 11 Most Popular Tomatoes you Should TryThe 11 Most amazing places on EarthWhy Smoothies Melt the Fat?
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Sunshine Coast-Au12 Dessert Recipes for the Mediterranean No-Sugar DietThe 11 Most Popular Tomatoes you Should TryThe 11 Most amazing places on EarthWhy Smoothies Melt the Fat?