टी सेंटर एक चांगला उद्योग । Tea Center business in Marathi

टी सेंटर एक चांगला उद्योग । Tea Center business in Marathi

चहाचा स्टॉल किंवा सेंटर (Tea Center business) तुम्ही चहाचा चांगला उद्योग करू शकाल कसे ते चला पाहुया.

प्रत्येक घरामध्ये सकाळी सर्वांना चहा हवा असतो. सकाळी उठल्यानंतर प्रथम आपण चहा घेतो. तर सगळ्यांना माहीतच आहे कि प्रत्येकाला चहा पिण्याची सवय आहे. काही लोकांना तर बऱ्याच वेळा सकाळपासून संध्याकाळपर्यंत चहा हवा असतो.

पण काहीजण आपल्या घरापासून लांब राहतात.  त्यांना ज्यावेळी चहाची गरज असेल त्यावेळी ते चहाचे स्टॉल किंवा स्नॅक सेंटर शोधून तिथे ते चहा घेतात. त्यामुळे शहरामध्ये चहासाठी खूप मागणी आहे. शहरामध्ये आणि बऱ्याच गावामध्ये सुद्धा चहा, नाश्ता आणि जेवण ह्यासाठी लोक बाहेरूनच विकत खायला घेतात.

जर तुम्ही सुद्धा नुसता चहाचा स्टॉल किंवा सेंटर Tea Center business आणि त्याबरोबर थोडे स्नॅक्स म्हणून खारी, बिस्कीट आणि क्रीमरोल ठेवले तरी तुम्ही चहाचा चांगला उद्योग करू शकाल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे चहा बनवण्यासाठी जास्त काही कष्ट घ्यायची गरज पण नाही. फक्त तो चहा जर तुम्ही उत्तम दर्जेचा लोकांना दिला तर तुम्ही ह्यापासून चांगला नफा कमवू शकता.    

टी सेंटरसाठी लागणारी जागा । Place for Tea Center

टी सेंटरसाठी तुम्हाला एक चांगली मोक्याची जागा बघून तिथे तुम्ही तुमचा स्टॉल उभा करू शकता. जर तुमच्याकडे जागेसाठी भांडवल नसेल तर तुम्ही तुमच्याकडे जर टु-व्हिलर असेल किंवा सायकल असेल तर त्यावरसुद्धा सुद्धा तुम्ही चहा विकू शकता. नाहीतर एखादे छोटेशे स्टॉल विकत घेऊन तिथे तुमचा उद्योग चालू करू शकता.

दुसरा पर्याय म्हणजे मोक्याची ठिकाणी जी दुकाने असतील आणि त्याच्यासमोर जर छोटीशी जागा असेल तर तिथे तुम्ही तुमचे स्टॉल उभारू शकता. त्यामुळे तुम्हाला कमी खर्चामध्ये चांगले स्टॉल उभारता येईल. तसेच बरेच लोक टु-व्हिलर वर सुद्धा आपल्या उद्योग चालू करतात. तुम्ही ते सुद्धा करू शकता. तसेच जर तुमचे घर एका चांगल्या मोक्याच्या ठिकाणी असेल तर तुमच्या घरासमोरच्या जागा तुम्ही तुमच्या चहाच्या उद्योगासाठी वापरू शकता.

टी सेंटरमध्ये चहाबरोबर अजून काही ठेवू शकतो का? । What we can include some snack with Tea

टी सेंटरमध्ये तुम्ही अजून बऱ्याच गोष्टी ठेवू शकता. सुरुवातीतील तुम्ही फक्त चहापासून सुरुवात करू शकता. त्याबरोबर लोकांना नाश्त्याची सुद्धा गरज भासते.

त्यासाठी तुम्ही बिस्कीट, बटर, खारी, क्रिमरोल असे बेकारीचे पदार्थ तुम्ही ठेवू शकता. शक्य असेल तर तुम्ही चहाबरोबर पोहे, उपमा, इडली, ढोकळा, वडापाव, सामोसा असे पदार्थ सुद्धा तुम्ही ठेवू शकता.

तुम्ही त्यासाठी तुमच्या हाताखाली लोक ठेवून त्याच्याकडून ते करून घेऊ शकता किंवा तुम्ही दुसऱ्या कुणाकडून ते पदार्थ कमी दरात विकत घेऊन ते चहासोबत खाण्यासाठी देऊ शकता.

त्यामुळे ज्या लोकांना नुसता चहा घ्यायचा असेल ते फक्त चहा घेऊ शकतात नाहीतर मग त्यासोबत त्यांना खायला काही हवे असेल तर तेहि त्यासोबत विकत घेऊ शकतात.  

टी सेंटरमध्ये लागणारा कच्चा माल किंवा वस्तू । Raw Material required for Tea Center

टी सेंटरमध्ये तुम्हाला चहा बनवण्यासाठी एक गॅस किंवा शेगडी आणि त्यासोबत चहा बनवण्यासाठी व दुधासाठी पातेले, चहाची मोठी गाळणी, चहाची किटली, चहासाठी कप ह्या सर्व गोष्टी तुम्हाला लागतील त्या तुम्ही एकतर तुमच्याकडे घरी एक्सट्रा असतील तर तुम्हाला ते विकत घ्यायची गरज नाही तुम्ही त्याच वस्तू वापरू शकता.

जर नसेल तर ह्या वस्तू तुम्ही तुमच्या ओळखीने नजीकच्या भांड्याच्या दुकानातून घेऊ शकता. गॅस नसेल तर तुम्ही त्याऐवजी शेगडी किंवा स्टोव्ह वापरू शकता. नाहीतर तुम्ही सुरुवातीला घरातूनच चहा बनवून तो किटलीतून गरम गरम घेऊन स्टॉलवर विकू शकता.

असे तुम्हाला मग जास्त काम करण्याची गरज नाही. घरातूनच सगळे तयार करून ते फक्त तुम्ही स्टॉलवर ठेवू शकता. फक्त चहा गरम राहण्यासाठी तुम्हाला चांगली किटली लागेल ज्यामुळे तुमचा चहा बराच वेळ गरम राहील. 

टी सेंटरमध्ये सर्वात प्रथम चहा बनवण्यासाठी तुम्हाला दूध, चहापावडर, चहाचा मसाला आणि साखर ह्या गोष्टी लागतील. त्यासाठी तुम्ही त्या वस्तू तुमच्या ओळखीने एखाद्या दुकानदाराला सांगून त्याच्याकडून मागवून घेऊ शकता. त्याच्याकडून कमी दरात ह्या वस्तू घेऊन तुम्ही मागवून घेऊ शकता. शिवाय तुम्ही अजून ठिकाणी जाऊन जो दुकानदार ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला कमी दरामध्ये जो कोणी देईल त्याच्याकडून खरेदी करू शकता.

तुम्हाला त्यासाठी लांब जाण्याची गरज नाही जवळचाच दुकानदार तुम्हाला ह्यामध्ये थोड्या कमी दरात तुम्हाला वस्तू देऊ शकतो. आणि जर तुम्ही नेहमी त्याच्याकडूनच जास्त वस्तू खरेदी केल्या तर त्यालापण ह्यापासून फायदाच होऊ शकतो. दुकानदार नेहमी जर येणारे गिर्हाईक असेल तर नक्कीच तो त्या माणसाला थोड्याफार प्रमाणात कमी दरात वस्तू देण्यास तयार होईल.

अशा प्रकारे तुम्ही सुरुवातीला तुमच्या लागणाऱ्या चहाच्या मटेरियलसाठी आसपासच्या दुकानदाराची मदत घेऊन तुम्ही तुमचा उद्योग चालू करू शकता. 

टी सेंटरसाठी लायसन्स आणि रेजिस्ट्रेशन । License and Registration required for Tea Center

टी सेंटरसाठी तुम्हाला प्रथम FSSAI ह्या लायसन्स तुम्हाला घ्यावे लागेल आणि GST रेजिस्ट्रेशन लागेल. तसेच तुम्हाला दुकानासाठी शॉप ऍक्ट रेजिस्ट्रेशन सुद्धा करावे लागेल. ह्याबद्दल तुम्ही सविस्तर माहिती तुमच्या नजीकच्या कार्यालयात जाऊन तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आणि किती खर्च लागेल ह्याविषयी सर्व माहिती तुम्हाला तिथून मिळेल. त्यांच्या मदतीने तुम्ही सर्व रेजिस्ट्रेशन्स व्यवस्थित करून घेऊ शकता आणि तुमचे काम तुम्ही चालू करू शकता. 

टी सेंटर उद्योगासाठी प्लॅन कसा तयार करावा? । How to make a plan for business?

टी सेंटरसाठी तुम्ही ज्या सरकारी गोष्टी किंवा जी कागदपत्रे लागतात ती तुम्ही तयार केली कि तुम्ही तुमच्या उद्योगधंद्यांची सुरुवात करू शकता. सर्वप्रथम तुम्ही ज्या  गोष्टी तुमच्या स्टॉलसाठी लागणार आहेत त्या सर्व गोष्टी तुम्ही कमी खर्चामध्ये कशा रीतीने मॅनेज कराल ते महत्वाचे आहे.

त्या जमा करून तुम्हाला त्याचा खर्च किती आला हे नेहमी आपण लिहून ठेवणे गरजेचे आहे. आणि त्यानंतर तुम्ही दिवसाला तुम्ही किती चहा आणि स्नॅक्स देणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला किती खर्च येणार आहे हे पाहणे महत्वाचे ठरते. तुमचा महिन्याचा खर्च किती असेल आणि त्यापासून तुम्हाला किती नफा घ्यायचा आहे ह्या सर्व गोष्टी अगदी प्लँनिंग पूर्वक तुम्ही करू शकता.

सुरुवातीला तुमच्याकडे ग्राहक कमी असतील त्यामुळे तुम्ही कमीत कमी इन्व्हेस्टमेंट करून त्यातून जो नफा येईल तो नंतर तुम्ही त्याच उद्योगामध्ये व्यवस्थितरीत्या वापरू शकता. तुम्हाला तुमचा ग्राहक किंवा कस्टमर वाढवण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल ह्याचा विचार पण तुम्हाला सुरुवातीलाच करावा लागेल. ह्या सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थितिरित्या प्लॅनिन्गपुर्वक तयार करून तुम्ही तुमच्या उद्योगाची वाटचाल करू शकता.

टी सेंटरसाठी लागणारे मदतनीस । Worker required for your tea center

टी सेंटरसाठी तुम्हाला जर मदतीला कुणी ठेवायचे असेल तर तुम्ही एक तुमच्या ओळखीने मदतीसाठी कुणीतरी ठेवू शकता. किंवा तुमच्या घरातीलच कुणी तुमच्या मदतीला घेऊ शकता. सुरुवातीला तुम्ही स्वतःसुद्धा कुणीही मदतीला न ठेवता तुमचे काम चालू करू शकता आणि जसा जम बसेल तसे तुम्ही लोक तुमच्या हाताखाली कामासाठी ठेवू शकता.

टी सेंटरसाठी लागणारा खर्च आणि इन्व्हेस्टमेंट । Investment and Cost required for tea Center

टी सेंटरसाठी तुम्ही कमीत कमी बजेटमध्ये तुमचे काम चालू करू शकता. तुमच्या बजेटनुसार तुम्ही ह्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करू शकता. त्यासाठी जास्त मोठा खर्च करून स्टॉल उभारण्याची गरज नाही. दुसऱ्या कुणी दुकानदाराच्या समोर जी जागा असेल त्या जागेमध्ये तुम्ही तुमचे स्टॉल कमी खर्चामध्ये उभारू शकता. 

टी सेंटरसाठी मार्केटिंग । Marketing for tea Center

मार्केटिंगसाठी तुम्ही तुमच्या चहाच्या गुणवत्तेद्वारेच तुमचे गिऱ्हाईक वाढवू शकता. तुम्ही चहामध्येच अजून काही वेगळ्या इतरांपेक्षा व्हरायटी आणून तुम्ही तुमचा कस्टमर किंवा ग्राहक आकर्षित करू शकता. तुम्ही जेवढ्या चांगल्या प्रतीचा चहा आणि पदार्थ लोकांना द्याल त्याप्रमाणेच तुम्हाला अजून ग्राहक वाढून तुमचा नफा वाढायला तुम्हाला मदत होईल. त्यामुळे सुरुवातीला तुम्ही चांगल्या प्रतीचा आणि दर्जेचा चहा आणि नाश्ता जेवढ्या जास्त लोकांपर्यंत पोहचवता येईल तेवढे प्रयत्न तुम्ही कराल. नंतर तेच ग्राहक तुमच्यासाठी अजून ग्राहक आणण्यास तुम्हाला मदत करतील.  

अशा रीतीने तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्ही तुमचा चहाचा उद्योग चालू करून तुमच्या उद्योगाची वाटचाल करू शकाल.

शिवणकाम उद्योग । Sewing business in Marathi

पैसे कमावण्यासाठी Teespring | Teespring business in Marathi

मिशो रिसेलर ऑनलाईन व्यवसाय आणि माहिती। Meesho Reseller Online Business in marathi

बेकिंग केक्स एक चांगला उद्योग । Cake baking business in Marathi

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Launceston-Au10 Easy weeknight dinners11 Easy Banana bread you should try!11 Easy lasagna recipe you should try!This Beetroot Smoothie to Glow your Skin
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Launceston-Au10 Easy weeknight dinners11 Easy Banana bread you should try!11 Easy lasagna recipe you should try!This Beetroot Smoothie to Glow your Skin