तुम्ही संत मायबाप । Tumhi Sant Maaybaap Lyrics
तुम्ही संत मायबाप हे एक भक्तिगीत आहे. ज्यामध्ये विठठल रुक्मिमीनीला संतांचे मायबाप संबोधले आहे.
महेश हिरेमठ हे या भक्तिगीताचे मुळ गायक आहेत.
तुम्ही संत मायबाप कृपावंत ।
काय मी पतित कीर्ति वानूं ॥१॥
अवतार तुम्हां धराया कारणें ।
उद्धराया जन जड जीव ॥२॥
तुम्ही संत मायबाप कृपावंत ।
काय मी पतित कीर्ति वानूं
वाढावया सुख भक्ति भाव धर्म ।
कुळाचार नाम विठोबांचे ॥३॥
तुम्ही संत मायबाप कृपावंत ।
काय मी पतित कीर्ति वानूं
तुका म्हणे गुण चंदनाचे अंगीं ।
तैसे तुम्ही जगीं संतजन ॥४॥
तुम्ही संत मायबाप कृपावंत ।
काय मी पतित कीर्ति वानूं
चला हो पंढरी जाऊ लिरिक्स l Chala ho pandhari jau lyrics
गजवदना मन नमले l Gajavadana Man namale
जय देव जय देवा सुंदरगजवदना । Jai Dev Jai Deva Sundargajavadana