उत्तपम रेसिपी । Uttappam Recipe in Marathi

उत्तपम रेसिपी । Uttappam Recipe in Marathi

उत्तप्पम (Uttappam Recipe) म्हटलं की साउथ इंडियन डिश डोळ्यासमोर येतात. उत्तप्पम म्हणजेच उत्तप्पा ही रेसिपी देखील साउथ इंडिया मध्ये जेवढी फेमस आहे तेवढी सर्व जगभर साउथ इंडियन फेमस आहेत.

साउथ इंडियन मध्ये प्रामुख्याने इडली, डोसा, उत्तप्पा सांबर, चटणी अशा अनेक प्रकारच्या रेसिपी तयार केल्या जातात. ज्या रेसिपी खायला पौष्टिक तर असतात आणि चविष्ट देखील तितक्याच असतात.

आपल्या सर्वांना साउथ इंडियन रेसिपी साउथ इंडियन लोकांप्रमाणे जमत नाहीत. तरीपण आपण काही प्रमाणात त्यांच्यासारख्या रेसिपी तयार करून घरी खातो. मेन म्हणजे ह्या रेसिपी सर्वांना आवडतात. तर आज आपण उत्तप्पा ही रेसिपी बनवणार आहोत.

उत्तप्पा ( उत्तप्पम ) बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • दोन कप तांदूळ
  • एक कप उडदाची डाळ
  • एक चमचा मीठ
  • दोन बटाटे
  • एक कांदा
  • अर्धी वाटी मटार
  • हळद
  • एक चमचा धने
  • मिरची, हिंग, जिरे आणि तूप

कृती

  1. रात्री तांदूळ व डाळ वेगवेगळी भिजत घालावी.
  2. सकाळी दोन्ही एकत्र करून वाटून घ्यावे.
  3. थोडेसे पाणी मिक्स करून मीठ टाकून उन्हामध्ये ठेवावे किंवा गरम ठिकाणी भांडे ठेवून द्यावे.
  4. बटाटे उकडून घ्यावेत.
  5. उकडलेले बटाटे चिरून कढईमध्ये एका तूप टाकून हिंग व जिरे टाकावे.
  6. मसाला टाकून सर्व बटाटे एकत्र मिसळावे आणि शिजत ठेवावे.
  7. भाजी पूर्णपणे सुखी अशी करावी.
  8. तांदूळ व डाळीचे मिश्रण तव्यावर गोल पसरून उत्तपे करावेत.

एका बाजूने पूर्ण उत्तप्पा भाजल्यानंतर मधोमध भाजी टाकून पुढे सारखे बंद करून मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजावेत.

उत्तप्पा करताना तुम्ही उत्तप्पा गोल तयार झाल्यानंतर त्याच्यावर भाजी पसरून त्यावर काटा कोथिंबीर आणि मसाला टाकून तसाच उत्तप्पा खायला दिला तरी चालेल.

काही ठिकाणी उत्तप्पा पुढे सारखा बनवला जातो तर काही ठिकाणी उत्तप्पा सरळ डोसा प्रमाणेच फक्त तो जाड असतो आणि त्याच्यावर वेगवेगळ्या भाज्यांचे टॉपिंग केलेले असते.

तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे उत्तप्पा करून खायला द्यावे आणि साउथ इंडियन डिश वेगवेगळ्या बनवून घरच्यांना खुश करावे. रेसिपी एकदा करून पहा आवडली तर शेअर करा.

आवळा चुंदा रेसिपी । Awala Chunda Recipe in Marathi

गाजराचे पुडिंग । Gajarache Puding Recipe in Marathi

भरलेली भेंडी रेसिपी । Bharleli Bhendi Recipe in Marathi

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Geelong-Au11 Best blue apron recipes11 Top fast food burger places in Chicago9 Benefits you know about coconut water11 Refreshing Green Smoothie Recipes
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Geelong-Au11 Best blue apron recipes11 Top fast food burger places in Chicago9 Benefits you know about coconut water11 Refreshing Green Smoothie Recipes