वेफर्स हा एक अतिशय चांगला छोटा व्यवसाय । Wafers business in Marathi

वेफर्स हा एक अतिशय चांगला छोटा व्यवसाय । Wafers is good small scale business in Marathi

Wafers business हा एक सध्या अतिशय चांगल्या रीतीने नफा मिळवून देणारा उद्योग आहे. काही नावाजलेल्या वेफर्सच्या कंपन्या चांगल्या रीतीने ह्यामध्ये आपले प्रॉफिट कमावतात. हा व्यवसाय चालू करण्यासाठी तुम्हाला बऱ्याच गोष्टी घरातच उपलब्ध असतात. बऱ्याचशा घरात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वेफर्स आणि बऱ्याच प्रकारचे उन्हाळी पदार्थ बनवण्याची परंपरा असते.

Wafers business
Wafers business

वर्षभरासाठी अशा पदार्थांचा आपण साठा करून ठेवतो. मग ज्यावेळी आपण जेवणाबरोबर खाण्यासाठी चवीप्रमाणे ह्यांचा वापर करतो. वेफर्स शक्यतो ज्यांचे उपवास असतात त्यावेळी ते खाण्यासाठी वापरले जातात.

काही जणांना वेफर्स कधीही भूक लागली कि खाण्यासाठी ते विकत घेऊन सुद्धा खाल्ले जातात. असे जर तुम्ही वेफर्स चा व्यवसाय चालू केला कि तुम्हाला ह्यापासून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. तुम्ही जर असाच उद्योग चालू करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही नक्कीच तुम्ही तो यशस्वीरीत्या करू शकाल.

वेफर्स हा उद्योग चालू करण्यासाठी लागणारी जागा । Place to start your wefers business

वेफर्स हा उद्योग तुम्ही घरून एखाद्या छोट्या रूममधून सुद्धा तुम्ही चालू करू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त वेफर्स तयार करण्यासाठी वेगळी रूम घ्यावी लागेल. तुमची स्वतःची रूम असेल तर उत्तमच. किंवा तुम्ही एखादी भाड्याने छोटीशी जागा विकत घेऊ शकता.

घरातूनसुद्धा हा व्यवसाय तुम्ही चालू करू शकता. फक्त ह्यासाठी तुम्हाला स्वतंत्र अशी जागा लागेल. आणि थोडीशी सुरक्षिततेनुसार काळजी घ्यावी लागेल. म्हणून घरापासून लांबच हा व्यवसाय तुम्ही चालू करू शकता. किंवा मार्केटमध्ये छोटीशी दुकानासमोर किंवा बाजूला अशी रूम घेऊन तिथे तुम्ही वेफर्सचा व्यवसाय चालू करू शकता.

वेफर्स/चिप्स मध्ये तुम्ही कोणकोणते प्रकारचे चिप्स करू शकता?। Which types of chips you can make?

वेफर्स/चिप्स मध्ये तुम्ही बऱ्याच प्रकारचे चिप्स बनवून ते विकू शकता. ह्यामध्ये तुम्हाला भरपूर प्रकारे चिप्स बनवू शकता.

बटाटा चिप्स – बटाट्याचे वेफर्सला सुद्धा खूप मागणी आहे. लोकांना हे वेफर्स कधीही भूक लागली आणि खाण्यासाठी काही नसेल तर दुकानात जाऊन वेफर्स विकत घेऊन ते खातात. तुम्ही वेफर्स ताज्या बटाट्यापासून बनवू शकता. बटाट्याचे वेफर्स काहीजण बटाटे वाळवून बनवतात. पण तुम्ही रेगुलर हा व्यवसाय करणार असाल तर ताजे ताजे बटाटे आणून त्यापासून तुम्ही पाहिजे तसे व्यवसाय बनवू शकता.

बटाट्याचे चिप्स बनवण्यासाठी ह्यामध्ये बऱ्याच प्रकारचे तुम्ही व्हरायटी करू शकता. जसे कि छोट्या छोट्या बारीक बटाट्यांच्या तुकड्यांचा तुम्ही चांगला चिवडा बनवू शकता. बटाट्याचे छोटे छोटे काप करून त्याला मीठ लावून तळून घेऊन त्यामध्ये शेंगदाणे आणि साखर टाकून गोड चिवडा सुद्धा तुम्ही विकू शकता.

तुम्ही ह्या बटाट्याचा तिखट चिवडा मिरचीपूड टाकून बनवू शकता. बटाट्याचे गोल काप करून त्यापासूनसुद्धा तुम्ही तिखट किंवा गोड चिवडा बनवू शकता. अशा प्रकारे तुम्ही बटाटयाच्या विविध प्रकारचा चिवडा किंवा नुसते वेफर्स बनवून सुद्धा चांगला नफा मिळवू शकता. 

बनाना चिप्स – बनाना चिप्स ला सुद्धा खूप मागणी असते. थोड्याशा कच्चा केळींना वाळवून त्यापासून बनाना चिप्स केले जातात. तुम्ही ताजी कच्ची केळी घेऊन त्यापासूनसुद्धा बनाना चिप्स बनवू शकता. लोकांना ताजे पदार्थ खायला खूप आवडतात.

बनाना चिप्स मध्ये सुद्धा तुम्ही तिखट आणि गोड अशा दोन्ही प्रकारचे चिवडे बनवून तुम्ही ते विकू शकता.

कारल्याचे चिप्स – कारल्याचे चिप्स सुद्धा तुम्ही विकू शकता.      

वेफर्स/चिप्स साठी लागणारा कच्चा माल । Raw material required for business

वेफर्स/चिप्स साठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे वेफर्स/चिप्स बनवणार असाल तर त्याप्रमाणे जास्त प्रमाणात मार्केटमधून कमी दरात एकदमच मटेरियल आणणे योग्य ठरते. जसे कि बटाटे, कच्ची केळी, कार्ले.

त्यानंतर मसाल्यामध्ये तुम्हाला तेल,लाल तिखट,शेंगदाणे, साखर आणि मीठ. तुम्हाला जर अजून त्यामध्ये बरेचसे मसाले वापरून चिवडे बनवायचे असतील तर तुम्ही ह्यामध्ये अजून काही मसाले तुमच्या गरजेप्रमाणे आणू शकता. हे सर्व साहित्य तुम्हाला होलसेल विक्रत्याकडे तुमच्या घरच्या सामानाबरोबर मिळून जाईल.  

तुम्हाला वेफर्स/चिप्स किसण्यासाठी एक छोटी किसणी, मोठा झारा आणि मोठी कढई. वेफर्स टाळून झाल्यावर ठेवण्यासाठी मोठी भांडी सुद्धा लागतील. ह्या सर्व गोष्टी विकत आणून किंवा तुमच्या घरी जास्त असतील तर त्या घ्याव्यात. ह्या सर्व गोष्टी एकत्र करून तुम्ही तुमच्या व्यवसायाला प्रारंभ करू शकता.

वेफर्स/चिप्स साठी लागणारे लायसन्स आणि रेजिस्ट्रेशन | Licenses and Registration required for Wafers/chips business

शॉप ऍक्ट रेजिस्ट्रेशन तुम्हाला सुरुवातीला करावे लागेल.

त्यानंतर जी. एस. टी. रेजिस्ट्रेशन करणे आवश्यक असते.

जर तुम्हाला तुमचा स्वतःचा ब्रँड एस्टॅब्लिश करून त्याद्वारे वेफर्स विकायचे असतील तर तुम्हाला ट्रेडमार्क रेजिस्ट्रेशन करावे लागेल.

फूड लायसन्ससाठी तुम्हाला एफ.एस.एस.ए.आय. आणि एफ.डी.ए. लायसन्स तुम्हाला लागतील.

ह्याव्यतिरिक्त तुम्ही इतर माहिती नजीकच्या सरकारी कार्यालयात जाऊन घेऊ शकता.

वेफर्स/चिप्स साठी ट्रैनिंग किंवा प्रोसेस । Training or Process for Wafers/Chips making

तुम्हाला वेफर्स/चिप्स बनवण्यासाठी कोणत्याही ट्रैनिंगची गरज लागत नाही. तुम्ही घरीच वेफर्स/चिप्स बनवायला शिकु शकता. त्यासाठी तुम्ही गूगल वर बऱ्याच तुम्हाला वेफर्स/चिप्स च्या रेसिपीस मिळतील.

तुम्ही युट्युबवर पण रेसिपीस पाहून तुम्ही वेफर्स/चिप्स बनवू शकता. ह्यामध्ये तुम्हाला घरी सुरुवातीला थोडी प्रॅक्टिस करावी लागेल. तुम्हाला मोठ्या प्रमाणात वेफर्स/चिप्स बनवण्यासाठी सुद्धा चांगला हात बसण्यासाठी थोडे दिवस वेफर्स/चिप्स घरीच वेफर्स/चिप्स बनवू शकता.

तुम्हाला जर बनवता येत नसतील किंवा तुम्ही वेफर्स/चिप्स बनवणार नसाल तर तुम्ही वेफर्स/चिप्स बनवण्यासाठी कोणीतरी चांगला मदतनीस घेऊ शकता. बरेच ठिकाणी असे कारागीर तुम्हाला मिळून जातील. त्यांच्या मदतीने तुम्ही तुमचा व्यवसायामध्ये चांगला जम बसवू शकता.

जर तुम्ही मोठी वेफर्स/चिप्सची कंपनी उभारणार असाल तर त्यासाठी आवश्यक गोष्टी । Important things, if you want to build your own company for wafers and chips. 

वेफर्स/चिप्सची तुम्ही जर मोठी कंपनी उभारण्याचा विचार करत असाल आणि तसे तुमचे बजेट असेल तर त्यासाठी तुम्ही मोठे प्रोडक्शन हाऊस उभारणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला काही वेफर्स/चिप्स तयार करण्यासाठी मशिन्स सुद्धा विकत घ्याव्या लागतील.

तसेच पॅकेजिंगसाठी लागणाऱ्या मशीन सुद्धा विकत घ्याव्या लागतील. वेफर्स/चिप्स साठी तुम्हाला चांगला प्लॅन तयार करावा लागेल. कंपनीसाठी लागणारे लायसन्स आणि रेजिस्ट्रेशन, मटेरियल, मशिन्स, कामगार, स्टाफ, पॅकेजिंग, मालासाठी गोडाउन, मार्केटिंग टीम, लागणारा खर्च, इन्व्हेस्टमेंट ह्या सर्व बऱ्याच गोष्टींचे व्यवस्थितरीत्या प्लॅनिंग करून मगच तुम्ही पुढचे नियोजन करू शकता. 

वेफर्स/चिप्स पॅकेजिंग । Wafers or Chips Packaging

वेफर्स/चिप्स साठी सुरुवातीला तुम्ही पॅकेजिंगसाठी पेपरबॅग्सचा वापर करू शकता. जर तुम्हाला तुमचे प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात करायचे असेल तर तुम्ही नंतर कोणत्याही पॅकेजिंग कंपनीकडे कॉन्ट्रॅक्ट देऊन तिथून पॅकेजिंग करून घेऊ शकता.

त्यासाठी तुम्हाला त्यांना जो पॅकेजिंगचा खर्च येईल तो त्यांना द्यावा लागेल. तुम्ही घरीसुद्धा पॅकेजिंग करू शकता. त्यासाठी छोटीशी एक मशीन तुम्हाला खरेदी करावी लागेल. मालाचे वजन करण्यासाठी एक मशीन सुद्धा तुम्हाला विकत घ्यावी लागेल.

तुम्ही दुकानदारांना विकण्यासाठी जर माल देणार असाल तर तुम्ही मोठ्या corrugated बॉक्समध्ये सर्व पॅक्स पॅक करू शकता.

वेफर्स/चिप्स ची किंमत । Price for wafers or chips

वेफर्स/चिप्स साठी तुम्ही तुमचा मालासाठी लागणारा खर्च आणि त्यातून तुम्हाला किती नफा मिळवायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मालाची किंमत ठरवू शकता. तुम्ही इतर ठिकाणी किती किंमत अशी कशी ठरवत आहेत ह्याची पडताळणी करून तुमच्या मटेरीयल ची किंमत ठरवू शकता. वजनाप्रमाणे तुम्ही पॅकिंग करून त्याप्रमाणे त्यामध्ये तुमचा नफा अधिक करून तुमच्या मालाची किंमत तुम्ही ठरवू शकता.

काही जण १० रुपये किंवा २० रुपये ह्याप्रमाणे पॅक्स बनवून विकतात त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा तुमचे मटेरियल किंवा पॅक्स बनवून त्याप्रमाणे तुम्ही किंमत ठरवू शकता.

वेफर्स/चिप्स साठी स्टाफ किंवा लागणारे मदतनीस । Required staff for Wafers or Chips business.

वेफर्स/चिप्स साठी तुम्हाला जर जास्त प्रमाणात मागणी असेल आणि तुम्हाला ते काम जर एकट्याला जास्त होत असेल तर तुम्ही त्यासाठी तुमच्या हाताखाली मदतनीस ठेवू शकता. तुम्हाला वेफर्स/चिप्स बनवण्यासाठी एक मदतनीस ठेवू शकता.

पॅकेजिंगसाठी कुणीतरी ठेवू शकता. आणि ऑर्डर घेण्यासाठी कुणीतरी एकजण तुम्ही ठेवू शकता. अशा प्रकारे तुम्हाला कोणत्या कामासाठी मदत हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही स्टाफ किंवा मदतनीस ठेवू शकता.

वेफर्स/चिप्स लागणारा प्लॅन आणि खर्च ।  Plan and investement for Wafers or chips business

कोणताही उद्योग चालू करण्यासाठी अगोदर व्यवस्थित प्लॅनिंगची गरज सर्वप्रथम असते. प्रत्येक उद्योग हा तेव्हाच मोठा होतो ज्यावेळी त्याची व्यवस्थितरित्या प्लॅनिंग करून त्याप्रमाणे प्रयत्न केले जातात.

म्हणून सर्वप्रथम तुम्ही हा व्यवसाय चालू करणार असाल तर त्याची व्यवथित एक योजना तयार करून आणि त्यासाठी लागणारा खर्च बघून त्यामधून तुम्हाला तुमचा नफा कसा वाढवता येईल हे पाहणे अत्यंत आवश्यक आहे.

म्हणून सर्वप्रथम ह्या सर्व गोष्टी बघणे गरजेचे आहे. ह्यामध्ये तुम्हाला मार्केटिंगसाठी अजून कोणत्या गोष्टी वापराव्या लागतील हे सुद्धा पाहणे अत्यंत महत्वाचे ठरते. नंतर मग तुम्ही पुढचे पाऊल घेऊन तुमच्या व्यवसायाचा प्रारंभ करू शकता.

वेफर्स/चिप्स व्यवसायासाठी मार्केटिंग ।  Marketing for Wafers or Chips

तुम्ही मार्केटिंग अनेक प्रकारे करू शकता. तुमच्या ओळखीने तुमचा नातेवाईकांना सांगून तुमच्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांना तुमच्या व्यवसायाची माहिती देऊन तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता.

तुमच्या नजीकच्या किंवा इतर शहरातील दुकानदारांना काही माल तुम्ही सॅम्पलसाठी विकायला देऊ शकता. अशा रीतीने त्यांना जर तुमचे प्रॉडक्ट्स आवडले आणि लोकांनी ते घेतले तर तुम्हाला अजून ऑर्डर्स मिळू शकतात. अशा प्रकारे तुम्ही विविधरित्या तुमच्या प्रोडक्टस ची लोकांना माहिती देऊन तुमचा माल खपवू शकता.

तुम्ही तसेच ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुमच्या प्रोडक्टसची मार्केटिंग करू शकता. त्यासाठी तुम्ही टीमचा व्हाट्सअँप वर ग्रुप बनवून लोकांना तुमचे प्रॉडक्ट शेयर करू शकता. तुम्ही इतर social मीडिया द्वारे देखील तुमचे प्रॉडक्ट शेयर करू शकता.

अशा प्रकारे तुम्ही तुमचा माल बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचवू शकता. तुम्ही चांगल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सुद्धा जसे कि ऍमेझॉन, फ्लिपकार्ट ह्याठिकाणी तुमचा व्यवसाय रजिस्टर करू शकता. अशा प्रकारे तुम्ही बऱ्याच प्रकारे तुमच्या प्रोडूक्टसचे मार्केटिंग करून तुमचा उद्योग चांगल्या रीतीने चालवू शकता.

अशा प्रकारे तुम्हाला जर चांगल्या रीतीने तुमचा उद्योग आणि व्यवसाय वाढवायचा असेल किंवा तुम्हाला कोणत्यातरी व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर तुम्ही वेफर्स किंवा चिप्स चा तुमचा नवा व्यवसाय उभारू शकता. आणि तो तुम्ही कमीत कमी खर्चात तुमच्या बजेटप्रमाणे चालू करून अधिकाधिक नफा मिळवू शकता.

तुम्हाला जर असेल आवड असा काही व्यवसाय करायची तर तुम्ही नक्कीच हा व्यवसाय करू शकता. आणि आपली स्वतःची व्यवसाय जगतात एक नवीन ओळख निर्माण करू शकता.

आणखी काही बिझनेस आयडिया –

बेकिंग केक्स एक चांगला उद्योग

चॉकलेट तयार करण्याचा उद्योग कसा चालू कराल?

कुरकुरे बनवण्याचा व्यवसाय

वेफर व्यवसाय काय आहे?

चिप्स व्यवसाय म्हणजेच वेफर व्यवसाय. तुम्ही बटाटा, केळी असे अनेक प्रकारचे चिप्स बनवून विकु शकता.

चिप्स व्यवसाय करणे फायदेशीर आहे का?

हो, चिप्स व्यवसाय करणे खुप फायदेशीर आहे.

केळी चिप्स फायदेशीर व्यवसाय करत आहेत का?

हो, केळी चिप्स देखील चांगला व्यवसाय करत आहेत.

केळी चिप्स व्यवसायात नफा मार्जिन किती आहे?

नफा मार्जिन मार्केट रेटप्रमाणे आणि लागणारा खर्च यावर अवलंबुन असते.

वेफर्स महाग आहेत का?

वेफर्स ला मागणी तर आहेच आणि शिवाय वेफर्स महाग आहेत.

कोणत्या कंपन्या वेफर्स बनवतात?

बालाजी, बुधानी, हल्दीराम यासारख्या कंपन्या वेफर्स बनवतात.

वेफर्स इतके महाग का आहेत?

वेफर्स तयार करण्यासाठी लागणारी मेहनत आणि प्रोसेस यामुळे वेफर्स महाग आहेत.

वेफर्सचे किती प्रकार आहेत?

वेफर्सचे बरेच प्रकार आहेत. बटाटा वेफर्स, केळी वेफर्स, कारल्याचे वेफर्स.

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Roanoke-Va11 Delicious Recipes to Bake It Better30-minute recipes you can try11 plants which are most popular in UsThe Plant That Brings Good Luck and Prosperity
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Roanoke-Va11 Delicious Recipes to Bake It Better30-minute recipes you can try11 plants which are most popular in UsThe Plant That Brings Good Luck and Prosperity