गार्डन बनवा आणि यूट्यूब चॅनेल सुरू करा । How to make YouTube channel of Garden in Marathi

गार्डन बनवा आणि यूट्यूब चॅनेल सुरू करा । How to make YouTube channel of Garden in Marathi

गावामध्ये घराभोवती छोटेसे गार्डन असतेच. किंवा आजकाल टेरेस वर देखील आपण गार्डन बघतो. गार्डन तुम्ही वेगवेगळ्या फुलांचे तयार करू शकता. तसेच फळे भाज्या यांचे देखील सुंदर असे गार्डन तयार करता येते.

YouTube channel of Garden
YouTube channel of Garden

असेच गार्डन तयार करून तुम्ही छानपैकी आपल्या घरा समोरील जागा सुशोभित करता येते. सध्या आपण ग्लोबल वॉर्मिग मुळे बरेच प्रॉब्लेम होत आहेत. जसे की वेळेवर पाऊस न पडणे. त्यामुळे शेती हा व्यवसाय चांगल्या रीतीने होत नाही. आपण पाहतो गरीब शेतकरी हा जास्त चांगल्या प्रकारे शेती करू शकत नाही. कारण पिकांचे कधीही पडणाऱ्या पावसामुळे नुकसान होते. काही ठिकाणी तर पाऊस पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. ज्यामुळे बरेच शेतकरी शेती सोडून नोकरीसाठी शहराकडे धाव घेवू लागले आहेत.

जरी तुम्ही शेतकरी असाल किंवा नसाल. पण तुम्हाला झाडे लावण्याची आवड असेल तर तुम्ही छोटेसे गार्डन तयार करून त्याचे व्हिडिओ बनवून तुम्ही यूट्यूब चॅनेल सुरू करू शकाल.

जरी तुम्हाला झाडे लावण्याची आवड जरी नसेल तरीदेखील तुम्ही काहीतरी काम करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी गार्डन तयार करून यूट्यूब चॅनेल सुरू करू शकता.

झाडे लावण्याची आवड तुम्हाला आपोआप लागेल. जसजसे वेगवेगळ्या झाडांचे, फुलांचे किंवा फळे व भाज्यांचे गार्डन बनवून हे व्हिडिओ बनवून घरिबसल्या कमाई करण्याची ही एक चांगली संधी आहे.

गार्डन तयार करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींची आवश्यकता

तुमचे स्वतःचे गार्डन असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये नवनवीन वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची, फळांची किंवा भाज्यांची रोपे लावावीत. आणि त्यांचे व्हिडिओ शूट करावेत.

सुरुवातीला तुम्ही जागेची निवड करावी. गार्डन तयार करण्यासाठी तुमची स्वतःची घरासमोर जागा असेल तर तिथेच छोटेसे गार्डन बनवावे. जागा नसेल आणि तुमच्याकडे टेरेस किंवा गॅलरी असेल तर त्यामध्ये तुम्ही छोटे गार्डन तयार करावे.

जागेची निवड केल्यानंतर तुम्ही गार्डन चे एक डिझाईन तयार करावे. त्याप्रमाणे कुंड्या किंवा जमिनीमध्ये झाडे योग्य त्या अंतरावर लावण्यासाठी कोणकोणती रोपे तयार करणार आहात त्याप्रमाणे रोपे किंवा बियाणे विकत अणावी.

अगदी तुमच्याकडे जरी घरामध्ये ज्या बी बियाणे असतील त्यांचा वापर देखील केला तरी चालू शकेल. त्यांचा देखील तुम्ही तुमच्या गार्डन मध्ये झाडे लावू शकता.

खते घरच्याघरी कसे तयार करता येतील हे बघावे. जसे की घरातील भाज्या सुकवून त्या मातीमध्ये मिक्स करून खत बनवावे. किंवा शेणखत विकत आणून ते खत जमिनीमध्ये योग्य प्रमाणात मिक्स करावे.

अशा प्रकारे नियोजन केल्यानंतर गार्डन तयार करण्यापासून खत तयार करण्यापर्यंत ते झाड तयार करण्यापर्यंत सर्व गोष्टी व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करून घ्याव्यात.

व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी तुम्ही तुमचा मोबाईल वापरावा. किंवा स्वतःचा तुमचा कॅमेरा असेल तर त्याने तुम्ही तुमचे व्हिडिओ शूट करू शकता. व्हिडिओ शूट करण्याअगोदर सर्व विडिओसाठी नियोजन करावे. तुम्ही व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी दाखावणार आहे त्या सर्व गोष्टींची व्यवस्थितपणे मुद्देसूद माहिती तयार करावी.

यूट्यूब चॅनेल संबंधी अजुन माहिती खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून मिळवा.

यूट्यूब चॅनेल बनवून घर बसल्या पैसे कमावण्याची एक सुवर्णसंधी

योग्य तो विषय निवडून त्यावर विडिओ बनवणे युट्युब चॅनेलसाठी महत्वाचे

युट्युब चॅनेलसाठी विडिओ कसे तयार करू शकता

युट्युब चॅनेल सुरु करताना विडिओ तयार करण्याअगोदर काही महत्वाच्या स्टेप्स

युट्युब चॅनेलसाठी विडिओ तयार करण्यासाठी विडिओ ऍप्स

युट्युब शॉर्ट्स आणि युट्युब विडिओ चॅनेल

यूट्यूब शॉर्ट्सद्वारे पैसे कसे कमवायचे

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Cairns-Au9 Veggie That Americans Love the Most!11 Air Fryer recipes you must try!The Best 11 Breakfast Sandwiches for Busy Mornings11 greens to simple Green Smoothies to glow your Skin
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Cairns-Au9 Veggie That Americans Love the Most!11 Air Fryer recipes you must try!The Best 11 Breakfast Sandwiches for Busy Mornings11 greens to simple Green Smoothies to glow your Skin