युट्युब शॉर्ट्स आणि युट्युब विडिओ चॅनेल | YouTube shorts and YouTube video channel

युट्युब शॉर्ट्स आणि युट्युब विडिओ चॅनेल | YouTube shorts and YouTube video channel in Marathi

युट्युब शॉर्ट्स आणि युट्युब विडिओ (YouTube shorts and YouTube video channel) हे दोन्ही विडिओच आहेत.

ह्यांच्यामध्ये इतकाच फरक आहे कि तुम्ही शॉर्ट्स मध्ये छोटे विडिओ म्हणजे कमी वेळेचे १ मिनिटापेक्षा कमी असलेले विडिओ पाहू शकता किंवा बनवू शकता. ह्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलचा वापर करून हे छोटे विडिओ बनून शॉर्ट्स म्हणून युटूबवर अपलोड करू शकता. सध्या सर्वात जास्त ट्रेंडिंग मध्य युट्युब शॉर्ट्स आहेत.

Table of Contents

लोक मोठे विडिओ खूप कमी बघतात म्हणून युट्युब ने नवीन युट्युब शॉर्ट्स हा प्लॅटफॉर्म लोकांना उपलब्ध करून दिला आहे. ज्यामध्ये तुम्ही अगदी कमी वेळेमध्ये भरपूर असे विडिओ बघू शकता. तुम्ही युट्युब विडिओ जर बनवत असाल तर त्यासोबत तुम्ही विडिओ शॉर्ट्स देखील बनवू शकता.

तुम्हाला तुमच्या व्हिडिओकरिता शॉर्ट्स खूप मदत करतील. सध्या युट्युब शॉर्ट्स हे टेस्टिंग मध्ये असल्याने हे गुगल जास्त प्रमाणात प्रमोट करत आहे. आणि युट्युब शॉर्ट्स बनवण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ पण द्यावा लागत नाही. जरी तम्ही तुमचा युट्युब विडिओ चॅनेल चालू नसेल केला आणि

तुम्हाला युट्युब शॉर्ट्स साठी एक युट्युब चॅनेल चालू करायचा असेल तर तुम्ही नवीन चॅनेल बनवून नियमितपणे छोटे छोटे विडिओ म्हणजे शॉर्ट्स चॅनेलवर अपलोड करू शकता. ह्यांच्यामध्ये तुम्हाला भरपूर views मिळतात आणि तुमचा चॅनेल लवकर पुढे जातो.

तुम्ही तुमच्या ब्लॉगसाठी युट्युब विडिओ आणि युट्युब शॉर्ट्स हे दोन्ही वापरू शकता. ह्यांच्यामुळे तुमचा युट्युब चॅनेल ग्रो तर होईलच शिवाय तुम्हाला अजून एक सोप्या पद्धतीने इनकम वाढून जाईल.

युट्युब शॉर्ट्स बनवण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. तुम्ही तुमचे रेगुलर जसे विडिओ बनवता तसेच तुम्ही शॉर्ट्सदेखील बनवू शकता. ह्याची विडिओ साईझ मोबाइल च्या साईझप्रमाणे असते.

१०८० ह्या साईझ मध्ये जे तुम्ही विडिओ बनवता आणि जे एका सेकंदापेक्षा कमी टाईम चे विडिओ असतात ते शॉर्ट्समध्ये मोडतात. त्यासाठी तुम्हाला फक्त टायटल मध्ये #शॉर्ट्स असे मेंशन करावे लागते म्हणजे ते शॉर्ट्स ह्या सेकशन मध्ये दिसतात.  

तुम्हाला युट्युब शॉर्ट्स आणि युट्युब विडिओ ह्यासाठी कोणताही वेगळा चॅनेल बनवायची गरज नाही. तुम्ही हे दोन्ही विडिओ एकाच युट्युब चॅनेलवर अपलोड करू शकता. फक्त तुम्ही जे विडिओ तयार करत आहे ते एकाच कॅटेगरी किंवा विषयाचे असले पाहिजे.

उदाहणार्थ तुम्ही जर फिटनेस हा ब्लॉग बनवला तर तुम्ही फिटनेस वरच युट्युब चॅनेल चालू करून त्यामध्ये फिटनेस संबंधी युट्युब विडिओ म्हणजे मोठे विडिओ आणि युट्युब शॉर्ट्स (छोटे विडिओ) बनवू शकता. अशा प्रकारे तुम्ही सहजरित्या युट्युब विडिओ ह्यांच्याबरोबर छोटे छोटे शॉर्ट्स देखील तुमच्या युट्युब चॅनेलवर अपलोड करू शकता. 

युट्युब शॉर्ट्स आणि युट्युब विडिओ एक वेगळे चॅनेल | YouTube shorts and YouTube videos a separate channel

जरी तुम्ही युट्युब शॉर्ट्स आणि युट्युब विडिओसाठी वेगवेगळे युट्युब चॅनेल ठेवले तरी चालू शकतात. तुम्ही तुम्हाला जसे सोयीस्कर वाटेल त्याप्रमाणे तुमचे चॅनेल ठेवू शकता. तुम्हाला जरी वेगळे चॅनेल किंवा वेगवेगळ्या विषयवार चॅनेल बनवून शॉर्ट्स आणि विडिओ अपलोड केले तरी चालू शकतात. तुम्ही जर वेगळा विषय निवडून तुमचा शॉर्ट्स चा चॅनेल बनवला तरी तुम्ही त्यापासून देखील चांगली इनकम मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त थोडासा वेळ देऊन छोटे क्लिप्स मोबाईलच्या साईझ मध्ये बनवून तुम्ही अपलोड करू शकता.

युट्युब शॉर्ट्स चॅनेलसाठी विषय निवडणे | Choosing a topic for the YouTube Shorts channel

तुम्ही जसे युट्युब व्हिडिओसाठी विषय निवडता त्याप्रमाणे देखील तुम्ही विषय निवडून तुमचा युट्युब शॉर्ट्सचा चॅनेल चालू करू शकता. किंवा तुम्ही तुमच्या ब्लॉगसाठी जर शॉर्ट्सचा चॅनेल चालू करणार असाल तर तुमचा ब्लॉग ज्या कॅटेगरी मध्ये बनवला आहे. त्या कॅटेगरी मध्ये तुम्ही देखील शॉर्ट्स बनवू शकता. आणि जर तुम्ही एक स्वतंत्र वेगळ्या विषयवार जर शॉर्टसाठी चॅनेल बनवणार असाल तर तुम्ही ट्रेण्डिंगमध्ये जे विडिओ शॉर्ट्स चालतात त्या विषयावर देखील तुम्ही शॉर्ट्स बनवू शकता.

युट्युब शॉर्ट्स तुम्हाला कुठे दिसतात? | Where do you see YouTube shorts?

तुम्ही जेव्हा मोबाईलमध्ये युट्युब ओपन करता त्यावेळी खाली होम च्या बटण नंतर एक शॉर्ट्स चे बटण मिळते त्याच्यावर तुम्ही क्लिक केले कि तुम्हाला शॉर्ट्स पाहायला मिळतात तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये देखील शॉर्ट्स हा सेक्शन पाहायला मिळतो तिथून देखील तुम्ही शॉर्ट्स मध्ये विडिओ पाहण्यासाठी जाऊ शकता.

तुम्हाला ह्या सेक्शनमधून युट्युब शॉर्ट्स पाहता येऊ शकतात. आणि तुम्हाला जर शॉर्ट्स बनवायचे आहेत तर तुम्ही सुरुवातीला तुमच्या कॅटेगरीमधील शॉर्ट्स कसे बनवले गेले आहेत ते पाहून देखील तुम्ही शॉर्ट्स बनवायला शिकू शकता. तुम्हाला जर विडिओ बनवायला येत असतील तर तुम्ही सहजपणे शॉर्ट्स बनवू शकता. शॉर्ट्स अपलोड करण्यासाठी तुम्ही जिथून विडिओ अपलोड करता तिथूनच तुमची शॉर्ट्स देखील अपलोड करू शकता.

 युट्युब शॉर्ट्स मॉनेटाईज करू शकतो का? | Can YouTube Monetize Shorts?

युट्युब शॉर्ट्सदेखील तुम्ही युट्युब व्हिडिओसारखे देखील मॉनेटाईझ करू शकता आणि तुम्ही पैसे कमवू शकता. शॉर्ट्सच्या विडिओची साईझ खूप कमी असल्यामुळे तुम्हाला ह्यामध्ये वॉच टाईम वाढवणे थोडे अवघड जाऊ शकते.

जर तुमचे views नेहमी अगदीच जास्त असतील तुमचा शॉर्ट्सचा चॅनेल मॉनेटाईझ होऊ शकतो. पण त्यासाठी तुम्हाला युट्युब विडिओ देखील अपलोड करावे लागतील ज्याच्यामुळे तुम्हाला वॉच टाईम वाढवून तुम्ही लवकर चॅनेल मॉनेटाईझ करू शकता.

सध्या युट्युब शॉर्टसाठी गुगलने एक फंड म्हणून विडिओ शॉर्ट्सच्या views प्रमाणे एक ठराविक रक्कम युट्युब creator ला देण्यात येते त्यामुळे त्यास्तही तुम्हाला चॅनेल मॉनेटाईझ करण्याची गरज नाही तुम्ही फक्त शॉर्टससाठी भरपूर views आणि तुम्ही जास्तीत जास्त शॉर्ट्स तुमच्या युट्युब चॅनेलवर अपलोड करणे आवश्यक आहे. ज्याद्वारे तुम्ही तुमचा इनकम लवकरच चालू करू शकता.

युट्युब शॉर्ट्स किंवा युट्युब विडिओ किती अपलोड करावे? | How many YouTube shorts or YouTube videos to upload?

तुम्ही ह्यासाठी एक तुमचे विडिओ बनवण्याचे आणि ते तुमच्या युट्युब अपलोड करण्याचे एक स्केड्युल किंवा चेकलिस्ट बनवून त्याप्रमाणे तुम्ही युट्युब विडिओ आणि युट्युब शॉर्ट्स अपलोड करू शकता. तुम्ही दररोज तुम्हाला जितके शॉर्ट्स बनवता येतील तेवढे किंवा १ ते ३ शॉर्ट्स नियमितपणे अपलोड करू शकता.

तुम्ही एका तासामध्ये किंवा दोन तासामध्ये जितके शॉर्ट्स बनवता येतील तितके शॉर्ट्स बनवून ते तुम्ही स्केड्युल करून युट्युब चॅनेलवर ठेवू शकता. म्हणजे तुमचे रेगुलर जे काही शॉर्ट्स असतील ते नियमितपणे लोकांना बघायला मिळतील आणि त्याप्रमाणे तुम्हाला जास्तीत जास्त views मिळत जातील. तुम्ही नियमितपणे ज्या टाईम मध्ये शॉर्ट्स अपलोड करता त्याप्रमाणे अपलोड करू शकता.        

यूट्यूब चॅनेल बनवून घर बसल्या पैसे कमावण्याची एक सुवर्णसंधी

योग्य तो विषय निवडून त्यावर विडिओ बनवणे 

यूट्यूब शॉर्ट्सद्वारे पैसे कसे कमवायचे

गार्डन बनवा आणि यूट्यूब चॅनेल सुरू करा

पाळीव प्राणी YouTube चॅनेल कसे सुरू करावे

Cooking यूट्यूब चॅनेल

युट्युब चॅनेलसाठी विडिओ कसे तयार करू शकता

युट्युब चॅनेल सुरु करताना विडिओ तयार करण्याअगोदर काही महत्वाच्या स्टेप्स

व्हिडिओ क्रिएशन  एक अत्यंत चांगली घरबसल्या पैसे कमावण्याची संधी

युट्युब शॉर्ट्स बनवण्यासाठी कोणते मोबाईल ऍप तुम्ही वापरू शकता? | What mobile app can you use to make YouTube shorts?

युट्युब शॉर्ट्स बनवण्यासाठी तुम्ही ज्या पद्धतीने विडिओ बनावट त्याप्रमाणेच कोणतेही विडिओ बनवण्याचे ऍप किंवा स्वतःचा चेहरा दाखवून देखील विडिओ बनवू शकता. युट्युब शॉर्टससाठी तुम्हाला वेगळे कोणतेही ऍप वापरण्याची गरज नाही. तुम्ही फक्त विडिओ ऍप मध्ये रेशो बदलून विडिओची साईझ शॉर्टसाठी जी पाहिजे ती ठेवून त्यामध्ये शॉर्ट्स बनवू शकता आणि विडिओ १ मिनिटापेक्षा कमी ठेवू शकता.  

युट्युब शॉर्टससाठी १००० सबस्क्रायबरची गरज आहे का? | Need 1000 subscribers for youtube shorts?

तुम्हाला युट्युब शॉर्टससाठी एक वेगळा फंड दिला जातो ज्याद्वारे तुमच्या गुगल ऍडसेन्सच्या अकाउंट मध्ये तुम्ही पैसे घेऊ शकता. हा फंड तुमच्या विडिओ शॉर्ट्ससाठी महिन्याला किती views आहेत त्याप्रमाणे दिला जातो. त्यामुळे ह्यासाठी सध्या तरी वेगळ्या मॉनेटायझेशनची युट्युब शॉर्टससाठी गरज नाही. तुम्हाला फंड जर मिळणार असेल तर तुमच्या जीमेल अकाउंट मध्ये ह्यासंदर्भात एक मेल येतो त्याद्वारे तुम्ही तुमचा फंड घेऊ शकता.  

युट्युब शॉर्ट्स कि युट्युब विडिओवर काम करणे योग्य? | Which is suitable for working on YouTube shorts or YouTube videos

दोन्ही प्लॅटफॉर्म हे अतिशय चांगला घरी बसल्या इनकम कमवण्याची साधने आहेत. जरी आटा युट्युब शॉर्ट्स खूप चालत असले तरी काही लोक मोठे विडिओ बघणे देखील पसंद करतात. लोकांना जर एखाद्या गोष्टीची पूर्णपणे माहिती हवी असेल तर ते विडिओवरती सगळी माहिती पाहणे त्यांना जास्त सोयीस्कर पडते.

म्हणून काही लोक विडिओ देखील बघतात. त्यामुळे युट्युब शॉर्ट्स आणि युट्युब विडिओ असे दोन्ही प्लॅटफॉर्म तुम्ही वापरू शकता आणि त्याच्यापासून जास्तीत जास्त लाभ तुम्ही घेऊ शकता. म्हणून तुम्ही युट्युब विडिओ बरोबरच युट्युब शॉर्ट्स देखील बनवून दोन्हीमध्ये तुम्ही चांगले एक्स्पर्ट होऊन एक चांगला इनकम किंवा तुमचा बिझनेस तुम्ही करू शकता.   

अशा प्रकारे तुम्ही जसे विडिओ बनवता तसेच तुम्ही विडिओ शॉर्ट्स देखील बनवून एक चांगला गुगल युट्युबच्या माध्यमाद्वारे आपला इनकम आणि ब्लॉगसाठी एक ट्राफिक मिळवण्यासाठी एक चांगले उपयुक्त असे साधन आहे. त्यामुळे तुम्ही ह्या दोन्ही गोष्टींचा वापर करून आपली क्रिएटिव्हिटी लोकांपर्यंत पोहोचवून आणि आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करून घरी बसल्या एक चांगला इनकम कमवा. 

युट्युब शॉर्ट्स आणि युट्युब विडिओ तुम्ही ज्यापद्धतीने युट्युब व्हिडिओवर काम करणार आहे त्याप्रमाणेच आणि त्याच स्टेप्स वापरून देखील तुम्ही युट्युब शॉर्ट्स बनवू शकता. शॉर्टससाठी आणि जास्त मेहनत घ्यावी लागत नाही.  एका मिनिटाचे विडिओ असल्याकारणाने ते लगेचच बनवून तयार होतात. एका तासामध्ये तुम्ही जर चांगला सराव करून शॉर्ट्स बनवले तर तुम्ही कमीत कमीत चार विडिओ शॉर्ट्स आरामात बनवू शकता.

तुम्ही अगोदरचे युट्युब व्हिडिओच्या रिलेटेड सर्व ब्लॉग वाचूनदेखील त्याप्रमाणे युट्युब शॉर्ट्सवर काम करून पैसे कमावू शकता.

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Roanoke-Va11 Delicious Recipes to Bake It Better30-minute recipes you can try11 plants which are most popular in UsThe Plant That Brings Good Luck and Prosperity
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Roanoke-Va11 Delicious Recipes to Bake It Better30-minute recipes you can try11 plants which are most popular in UsThe Plant That Brings Good Luck and Prosperity