झणझणीत शेव भाजी ही रेसिपी | Zhanjanit Shev Bhaji Recipe

झणझणीत शेव भाजी ही रेसिपी | Zhanjanit Shev Bhaji Recipe

शेव भाजी ही रेसिपी (Shev Bhaji Recipe) महाराष्ट्र मध्ये खूप फेमस आहे. शेव भाजी तयार करण्यासाठी थोडीशी जाडसर अशी आणि तिखट अशी शेव वापरली जाते .

शेवभाजी करायला सोपी आहे. पण शेव भाजीची जी तरी बनवली जाते ती अतिशय चविष्ट आणि झणझणीत अशी असते. विदर्भामध्ये ही शेव भाजी खूप प्रमाणात प्रसिद्ध आहे. तर आज आपण पाहणार आहोत शेव भाजी कशी तयार करायची ते.

शेव भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • अर्धा ते एक कप शेव
  • अर्धा कप बारीक चिरलेले टोमॅटो
  • अर्धा कप बारीक चिरलेला कांदा
  • एक चमचा आले लसणाची पेस्ट
  • अर्धा चमचा हळद
  • अर्धा चमचा लाल तिखट
  • अर्धा चमचा गरम मसाला
  • चवीनुसार मीठ
  • दोन ते तीन टीस्पून तेल
  • अर्धा चमचा मोहरी
  • अर्धा चमचा जिरे
  • थोडेसे हिंग
  • सहा ते सात कढीपत्त्याची पाने
  • थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली

कृती

  1. सर्वप्रथम एका भांड्यामध्ये शेव काढून घ्यावी.
  2. एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता घालून तडकवावा.
  3. मोहरी तडकली की त्यामध्ये कांदा घालून परतून घ्यावा.
  4. कांदा चांगला लालसर झाला की त्यामध्ये आले लसणाची पेस्ट आणि टोमॅटो घालून चांगले परतून घ्यावे.
  5. टोमॅटो मऊ आणि शिजला की त्यामध्ये हळद आणि लाल तिखट व गरम मसाला घालून मिक्स करावे. वरून चवीनुसार मीठ टाकावे.
  6. थोडा वेळ तसेच झाकून हे मिश्रण ठेवावे व नंतर यामध्ये तुम्हाला ग्रेव्ही ज्याप्रमाणे बारीक करायची आहे, त्या प्रमाणात पाणी घालून चांगली उकळी येऊ द्यावी.
  7. पातळ आमटीला उकळी आल्यानंतर पाच ते दहा मिनिटे गॅस बारीक करून तसेच हे मिश्रण शिजू द्यावे.
  8. मिश्रण चांगले शिजल्यानंतर गॅस बंद करून त्यामध्ये शेव टाकावी व कढईला झाकण लावून तसेच ठेवावे.

महत्त्वाच्या टीप

शेव भाजी बनवताना शेव जास्त भिजून देऊ नये. म्हणून शेव नंतरच टाकावी.
शक्यतो भाजी करून ज्यावेळी तुम्ही गरम गरम भाजी सर्व करणार आहात त्यावेळी शेव टाकून ही भाजी खाण्यासाठी द्यावी.

आवडीनुसार आपले मसाले शेव भाजी मध्ये वापरावेत जसे की धने, जिरे पावडर, गरम मसाला, कोथिंबीर इत्यादी. शेव भाजी बरोबर तुम्ही गरम गरम रोटी किंवा चपाती खायला देऊ शकता.

शेव भाजी ही रेसिपी अत्यंत झणझणीत आणि चटपटीत अशी आहे.
त्यामुळे सर्वांना जर झणझणीत भाजी आवडत असेल तर शेव भाजी नक्की करून पहावी.
शेव भाजी या पद्धतीने करून पहा आणि आपली रेसिपी सर्वांना शेअर करा कमेंट करायला विसरू नका.

पांढऱ्या वांग्याचे लोणचे रेसीपी। Pandhrya Wangyache Lonche recipe in Marathi

बासुंदी रेसिपी l Basundi Recipe

अखंड मुगाची कचोरी रेसिपी l Akhand Mugachi Kachori Recipe

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Sunshine Coast-Au12 Dessert Recipes for the Mediterranean No-Sugar DietThe 11 Most Popular Tomatoes you Should TryThe 11 Most amazing places on EarthWhy Smoothies Melt the Fat?
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Sunshine Coast-Au12 Dessert Recipes for the Mediterranean No-Sugar DietThe 11 Most Popular Tomatoes you Should TryThe 11 Most amazing places on EarthWhy Smoothies Melt the Fat?